AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखे पाटील भाजपचा छुपा नाही, जाहीर प्रचार करतायत : संग्राम जगताप

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचा उमेदवार असलेला त्यांचा मुलगा सुजयचा छुपा नाही, तर जाहीरपणे प्रचार करत असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. पण काहीही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी केला. संग्राम […]

विखे पाटील भाजपचा छुपा नाही, जाहीर प्रचार करतायत : संग्राम जगताप
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचा उमेदवार असलेला त्यांचा मुलगा सुजयचा छुपा नाही, तर जाहीरपणे प्रचार करत असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. पण काहीही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी केला.

संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संग्राम जगताप यांच्या घरी देवपूजा केल्यानंतर, औक्षण झाल्यानंतर ते घराबाहेर पडले. ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीचं दर्शन घेऊन शहरातील माळीवडा परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत संग्राम जगताप यांच्यासह अंकुश काकडे, आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीची सांगता करून संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे संग्राम जगताप यांनी कुटुंबासोबत नाही, तर शेतकरी दाम्पत्याच्या हाताने उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीला जमलेली गर्दी ही उत्स्फूर्त होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक मीच जिंकणार, असा दावा त्यांनी केला.

विखेंवर संग्राम जगताप काय म्हणाले?

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद