Rahul Gandhi: निवडणुका चोरण्याचा नवा मॅप.. राहुल गांधींचा हल्लाबोल; ‘डिलिमिटेशन’मागची खेळी सांगितली

भाजप निवडणुका चोरते. ते दरवेळी निवडणुका चोरण्याचा नवनवीन मार्ग शोधत असतात.२०२४ ची निवडणूक ही अवैध आहे.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर मतदार वाढले. पश्चिम बंगालमध्ये १०० जागा चोरल्या. हरियाणाच्या यादीमध्ये तर ब्राझीलच्या मॉडेलचे नाव होते, असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Rahul Gandhi: निवडणुका चोरण्याचा नवा मॅप.. राहुल गांधींचा हल्लाबोल; डिलिमिटेशनमागची खेळी सांगितली
Rahul Gandhi
| Updated on: Nov 28, 2026 | 6:05 PM

Rahul Gandhi PC:  केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विधेयकाला इंडिया आघाडीकडून जोरदार विरोध होत आहे. याच संदर्भात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी हे विधेयक आणण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव असल्याचा दावा करत गंभीर आरोप केले.

काय म्हणाले राहुल गांधी?

“याआधाही भारतीय जनता पक्षाने कशा निवडणूका चोरल्या याबाबत आपण पत्रकार परिषद घेतल्या. देशातील ८० टक्के लोकांचा विश्वास आहे की भाजप निवडणुका चोरते. ते दरवेळी निवडणुका चोरण्याचा नवनवीन मार्ग शोधत असतात.२०२४ ची निवडणूक ही अवैध आहे.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर मतदार वाढले. पश्चिम बंगालमध्ये १०० जागा चोरल्या. हरियाणाच्या यादीमध्ये तर ब्राझीलच्या मॉडेलचे नाव होते.

Loading...

“महिला आरक्षण बील हे आधीच मंजुर झाले आहे. आत्ताही सध्याच्या संख्येवर ते लागू होऊ शकते. आता डिलिमेटशनच्या माध्यमातून ते 850 जागांवर त्यांना कुठे रंग भरायचे आहेत ते त्यांच्या मताने भरतील. यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. असाच त्यांचा प्लॅन आहे. 850 हा लोकशाहीची हत्या करणारा आकडा आहे. हाच आकडा भारतातील लोकशाही संपवणार आहे, डिलिमिटेशनमुळे 2051 पर्यंत मतदारसंघ फ्रीज केले जातील. ” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला मतचोरीवरुन आम्ही घेरले. १० वर्ष त्यांनी मतचोरी करुन विजय मिळवला त्यांचा तो रस्ता बंद झाला आता त्यांनी नवा मार्ग निवडला आहे. ते कुठेही जाऊ आम्ही त्यांना शोधून काढू.१४० मिलियन मतदार आत्ता निवडणूक आयोगाने अवैध मानले आहे. हे मतदार मतदान करु शकत नाहीत असं निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मग 2024 ची निवडणूक खोटी होती का? याचे उत्तर निवडणूक आय़ोगाने द्यावे, असं राहुल गांधी म्हणालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us