पंतप्रधान मोदी मोरासोबत व्यग्र, नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा : राहुल गांधी

| Updated on: Sep 14, 2020 | 12:15 PM

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनावरील केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर सडकून टीका केली आहे (Rahul Gandhi criticize PM Narendra Modi).

पंतप्रधान मोदी मोरासोबत व्यग्र, नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनावरील केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर सडकून टीका केली आहे (Rahul Gandhi criticize PM Narendra Modi). देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर बोट ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. देशात कोरोना संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदी मोरासोबत व्यग्र आहेत, त्यामुळे देशातील नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा, असं आवाहन राहुल गांधींनी केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका व्यक्त केली.

राहुल गांधी म्हणाले, “भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 10 लाखांचा आकडा पार करेल. कोणतंही नियोजन न करता केलेला लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झाला. मोदी सरकार ‘आत्मनिर्भर बनो’ असं म्हणत आहे या ‘आत्मनिर्भर’ होण्याचा अर्थ आपला जीव आपणच वाचवा असा आहे. कारण पंतप्रधान मोदी मोरांसोबत व्यग्र आहेत.”

पंतप्रधान मोदींच्या अहंकारामुळे लाखो लोक बेरोजगार : राहुल गांधी

राहुल गांधी यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर केलेल्या एका पोस्टमध्ये मोदींकडून शेअर केलेल्या एका व्हिडीओचाही उल्लेख केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानावर मोरांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तसेच मोरांना दाणे टाकतानाही दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओत मोदी योगा करत आहेत. त्याचाच संदर्भ घेऊन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या अहंकाराने भरलेल्या धोरणांमुळेच देशातील लाखो लोकांना बेरोजगार होण्याची वेळ आल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

काँग्रेस फक्त ट्वीट्सचा पक्ष झालाय : प्रकाश जावड़ेकर

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी यांची चेष्टा करत म्हटलं, “राहुल गांधी दररोज ट्वीट करत आहेत. यावरुन असं वाटतंय जसं की काँग्रेस केवळ ट्वीट्सचा पक्ष झालाय. कारण ते लोकांमध्ये येत नाहीत, काम करत नाहीत आणि एकामागून एक नेते गमावत आहे. त्यामुळे ते निराश होऊन अशा प्रकारचे हल्ले करत आहेत.”

संबंधित बातम्या :

कोव्हिड तर निमित्त, मोदी सरकारला सरकारी कार्यालयं कर्मचारीमुक्त करायची आहेत : राहुल गांधी

NEET-JEE ऐवजी खेळण्यांवर चर्चा, मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on Corona and Peacock