राहुल गांधी जिला महिला म्हणाले, तो निघाला बाप्या, त्या व्हिडीओची पोलखोल; भाजपचा हल्लाबोल

राहुल गांधींनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओतील 'महिला मारहाणी'चा दावा भाजपने खोडून काढला आहे. व्हिडिओतील व्यक्ती पुरुष असल्याचे सांगत भाजपने राहुल गांधींवर गैरमाहिती पसरवल्याचा आरोप केला. दिल्लीतील मारहाणीप्रकरणी हिंदू रक्षा दलाच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी भाजपची मागणी आहे.

राहुल गांधी जिला महिला म्हणाले, तो निघाला बाप्या, त्या व्हिडीओची पोलखोल; भाजपचा हल्लाबोल
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 12:58 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल एक्सवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत काही मुलं मारहाण करताना दिसत होते. यात एका ब्लॅक टी शर्ट घातलेल्या मुलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी त्यावर एक पोस्ट लिहिली होती. अमित शाह यांचे दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत. आता संघ आणि भाजपच्या गुंडांनाही महिला आणि तरुणांना मारहाण करण्याची मोकळीक मिळालेली आहे. या मारहाण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे, असं राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मात्र, भाजपने राहुल गांधी यांच्या या व्हिडीओची पोलखोल केली आहे. राहुल गांधी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. व्हिडीओत ज्या महिलेला मारहाण झाल्याचं राहुल गांधी सांगत आहेत. ती महिलाच नाहीये. तर तो पुरुष आहे. राहुल गांधी हे महिलेला मारहाण झाल्याचं जाणूनबुजून सांगत आहेत. लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Loading...

 

भाजपने नेमकं काय म्हटलं?

भाजपने राहुल गांधी यांच्यावर खोटं पसरवण्याचा आणि देशाची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी असत्य पसरवू नये. तसेच देशाची दिशाभूल करू नये. आपला अजेंडा पुढे सरकवण्यासाठी मुलाला मुलगी म्हणून सांगत आहेत. त्यांनी चुकीची माहिती देऊन अशांतता पसरवण्याऐवजी सत्य समोर आणावं. आपली चूक सुधारावी आणि देशाची माफी मागावी, असं भाजपने म्हटलं आहे.

हिंदू रक्षा दलाचे चौघे अटकेत

राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने पसरला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन मारहाण करणाऱ्या चार आरोपींना अटक केली होती. मारहाण करणाऱ्यांनी आपण हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं होतं. हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष भूपेंद्र ऊर्फ पिंगी चौधरी यांच्या सांगण्यावरून त्यांनी या मुलाला मारहाण केली होती. तशी आरोपी या चारही आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us