AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नको? राहुल गांधींचं धक्कादायक विधान काय? मोठा ट्विस्ट?

राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर पुन्हा जोरदार हल्ला चढवला आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा न घेतल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'आम्हाला तेच हवंय, सरकार मोठी चूक करत आहे', असं राहुल गांधी म्हणाले. दिल्लीत आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहून, 'हे सरकारची चूक आहे, आम्हाला हेच हवंय', असा दावा त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नको? राहुल गांधींचं धक्कादायक विधान काय? मोठा ट्विस्ट?
Rahul GandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 12:32 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने रस्त्यारस्त्यावर हजारो पोलीस तैनात केले आहेत. दिल्लीला एखाद्या किल्ल्यासारखं स्वरुप आलं आहे. असं करून सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला हेच हवं आहे. मोदी आणि त्यांचे लोक ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहोत, तरी ते राजीनामा घेत नाहीत. त्यांना अभय देत आहेत. आम्हाला तेच हवं आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

ज्ञानेश कुमार आणि व्होट चोरीवरून गेल्या चार पाच दिवसापासून दिल्लीत पब्लिक आंदोलन सुरू आहे. देशाची राजधानी दिल्ली जेल का बनली आहे? ट्रेन, बसेस रोखण्यात येत आहेत. दिल्लीचा किल्ला बनवला आहे. सर्वत्र 20 ते 30 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आम्हाला वाटतं 20 ते 30 हजार पोलीस रस्त्यावर यावेत. हे आम्हाला वाटतं. आणि हे सरकार हीच मोठी चूक करत आहे. आम्हाला देशाला दाखवायचं आहे की सरकार आणि नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना अभय देत आहेत. आम्ही राजीनामा मागत आहेत, पण आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं. ते जेवढं प्रोटेक्ट करतील तेवढं आम्ही त्यांच्या कंट्रोलरकडे जाऊ, असं राहुल गांधी म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांना झोप लागत नाहीये

आम्हाला सगळीकडून माहिती मिळत आहे. ज्ञानेश कुमार यांची काय हालत आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. घाबरू नका. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लाखो लोक रस्त्यावर आहेत. तुमच्या स्वभावाबाबत ते विचारत आहेत. तुमच्यासमोरही काही लोक आहेत. त्यांना हटवण्यासाठी आम्हाला तुम्हाला हटवायचं आहे. त्यामुळेच आमचं आंदोलन सुरू आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

पोलीस डिस्टर्ब

यावेळी त्यांनी पोलीसही डिस्टर्ब असल्याचं सांगितलं. पोलीस डिस्टर्ब आहेत. आम्हाला तरुणांना का मारायला सांगत आहात? असा सवाल पोलीस करत आहेत. संघाच्या लोकांना मुक्त फिरवण्यास मुभा देण्यास सांगितलं जात आहे. पोलीस, सीआरपीएफ, आयटीबीटीत हा सवाल केला जात आहे. भाजपचे गुंड महिलांना मारत आहेत. तरुणांना मारा, पॅलेट गन चालवा म्हणून सांगत आहेत. दुसरीकडे संघाचे तरुण आणि गुन्हेगारांना सोडा आणि या लोकांच्या माध्यमातून तरुणांना मारहाण करा, असं पोलिसांना सांगितलं जात आहे. यामुळे आम्हाला फायदा होत आहे. मी तुम्हाला आनंदाने सांगतो, 50 टक्के पोलीसवाले सांगत आहेत, तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. तुम्ही करत राहा, असं ते म्हणाले.

आम्ही कोर्टात जाणार

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असं सांगतानाच केंद्र सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात असून आम्हाला सर्व माहिती देत आहेत, असा दावाही त्यांनी केला

Follow Us
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...