माथेरानच्या 10 नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती, निकाल कधी लागणार?

| Updated on: Oct 26, 2021 | 9:08 PM

दोन्ही बाजूच्या वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोरचा युक्तिवाद पूर्ण केला आहे. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीची पुढची तारीखही पक्षकारांना दिलेली नाही.

माथेरानच्या 10 नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती, निकाल कधी लागणार?
माथेरानमधील शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश (फाईल फोटो)
Follow us on

रायगड : माथेरान नगरपरिषदेचे भाजपवासी झालेल्या 10 नगरसेवकांचा फैसला आता रायगड जिल्हाधिकारी याच्या आदेशानंतर होणार आहे. आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासमोर दोन्ही पक्षाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोरचा युक्तिवाद पूर्ण केला आहे. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीची पुढची तारीखही पक्षकारांना दिलेली नाही. त्यामुळे आता भाजपवासी झालेल्या नगरसेवकांचा फैसला हा जिल्हाधिकारी यांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. आज माथेरानमधील नगरसेवकांबाबत जिल्हाधिकारी निकाल देतील अशी चर्चा होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवलाय. (Raigad District Collector reserved the verdict regarding Matheran corporators)

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर निकाल राखून ठेवला

माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी मे महिन्यात कोल्हापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. याबाबत शिवसेनेतर्फे पक्षांतर बंदी कायद्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. शिवसेनेच्या तक्रारीनुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर गेल्या सहा महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर आज 26 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर निकाल देतील अशी चर्चा होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवलाय. आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आधीच्या निर्णयाचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. मात्र निर्णय अजून राखून ठेवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर याच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी भाजपवासी नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक, दोन्ही पक्षाचे वकील सुनावणीला उपस्थित होते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी हे काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेनेतुन भाजपामध्ये प्रवेश केलेले नगरसेवक.

>> आकाश कन्हैया चौधरी – उपनगराध्यक्ष / आरोग्य सभापती
>> राकेश नरेंद्र चौधरी
>> संदीप कदम
>> सोनम दाभेकर – महिला बालकल्याण समिती सभापती
>> प्रतिभा घावरे – शिक्षण समिती सभापती
>> रुपाली आरवाडे
>> सुषमा जाधव
>> प्रियांका कदम
>> ज्योती सोनावळे
>> चंद्रकांत जाधव – स्वीकृत नगरसेवक

भाजपकडून मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये

माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही 27 मे 2021 रोजी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. 26 मे रोजी भाजपच्या मुक्ताईनगरच्या आजी-माजी 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या 12 तासात भाजपने हा वचपा तिकडे माथेरानमध्ये काढला. 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, शिवसेनेची सत्ताच पालटली आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का बसला होता.

इतर बातम्या :

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’, वानखेडे प्रकरणात चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांचा प्रत्युत्तर

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

Raigad District Collector reserved the verdict regarding Matheran corporators