AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन विरोधी बाकावरील महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि ठाकरे गटानेही आपापल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Aug 07, 2025 | 3:51 PM
Share

Raj Thackeray And Uddhav Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही तशा प्रकारचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुतोवाच केलेले आहे. विशेष म्हणजे मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यास आगामी काळातील राजकारण बदलू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मुंबई महापालिकेच्या तसेच एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता या दोन्ही बंधूंची युती प्रत्यक्षात नावारुपाला आली आहे. विशेष म्हणजे या युतीचा फॉर्म्यूलाही समोर आला आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन विरोधी बाकावरील महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मनसे आणि ठाकरे गटानेही आपापल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. युतीचं काय करायचं ते आम्ही बघू. हा निर्णय आमच्यावर सोडा. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असं नुकतेच उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच मनसेचे राज ठाकरे यांनीही ठाकरे गटासोबतच्या युतीचा निर्णय माझ्यावर सोडा. मी योग्य भूमिका घेऊन ती जाहीर करेन, असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ही युती कधी नावारुपाला येणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र आले, आता लवकरच…

दरम्यान, लवकरच मुंबईतील बेस्ट कामगार मतपेढीची निवडणूक होणार आहे. याच निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात जागावाटपही ठरले असल्याचे बोलले जात आहे. उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार आहेत. या युतीमध्ये जागावाटपावर आजच (7 ऑगस्ट) शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी 19 जागांवर उद्धव ठाकरेंची कामगार सेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर उर्वरित 2 जागा मनसेच्या बेस्ट कामगार संघटनेला देण्यात येतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच