AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले, यंदा…

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्कवरील दीपोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या बांधवांना दुष्काळाने ग्रासले असताना उत्सव साजरा करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यंदा उत्साहावर नियंत्रण ठेवून फराळ व कंदील लावण्याचे आवाहन त्यांनी केले, तर फटाके व रोषणाई टाळण्याचे म्हटले आहे.

दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले, यंदा...
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 10:51 AM
Share

उद्यापासून राज्यात दिवाळी साजरी होत आहे. दिवाळी निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. लोक खरेदी विक्री करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात भयानक दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शिवाजी पार्कात होणारा मनसेचा दीपोत्सव यंदा होणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर एक व्हिडीओ ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपले बांधव दुष्काळाने होरपळत असताना दीपोत्सव साजरा करणं मनाला पटत नाही, अशा भावनाही राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. राज यांच्या या निर्णयामुळे यंदाचा शिवाजी पार्कातील मनसेचा दीपोत्सव होणार नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यातून त्यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दीपोत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कात प्रचंड उत्साह असतो. रोषणाई केलेली असते. फटाक्यांची आतषबाजी असते. ही आतषबाजी पाहण्यासाठी मुंबई-ठाण्यासह राज्यभरातून लोक येता आणि त्याचा आनंद लुटतात. सर्वजण मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेला, येऊ घातलेला भयानक दुष्काळ आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा उत्सव साजरा व्हावा हे मनाला पटलं नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यांना काय वाटेल?

आज महाराष्ट्र एका विचित्र अवस्थेतून जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ भयानक आहे. या परिस्थितीत आपण ज्या उत्साहात दिवाळी साजरी केली तर राज्यातील आपले बांधव, भगिनींना काय वाटेल? त्यांच्या कच्चाबच्च्यांना काय वाटेल? या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे, असं राज यांनी म्हटलं आहे.

मी तुम्हाला विनंती करतो…

1972 पेक्षाही यंदा भयानक दुष्काळ असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे आधी जाहीर करूनही सत्ताधारी पक्षातील लोकांना ते कळलं नाही. ते गरबा खेळत बसले. तो त्यांचा प्रश्न आहे. पण अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करणं मनाला पटत नाही. त्यामुळे या वर्षी दीपोत्सव साजरा करायचा नाही. पुढच्या वर्षी सर्व ठिकठाक होईल ही आशा आहे. राज्यातून तांडेच्या तांडे बाहेर पडतील ते शहरात येतील. शहराची परिस्थिती आपण पाहत आहोत. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्याला काळी दिवाळी साजरी करायची नाही. पण उत्साहाला आवर घालणं आवश्यक आहे. फटाके फोडताना आवर घाला. आपण महाराष्ट्रातील नागरिक आहोत. महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे. आपले लोक होरपळत असताना अशा पद्धतीने उत्सव करणं पटत नाही. अर्थात कंदिल लावा. फराळ वाटा. पण रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घाला. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण जोरात हा दीपोत्सव साजरा करूया, असंही ते म्हणाले.

Follow Us
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?