Raj Thackeray: काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना मोर्चात बोलावणार का? राज ठाकरेंनी दिलं एका वाक्यात उत्तर

Raj Thackeray: येत्या 4 ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूचा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महामोर्चा आहे. या मोर्चात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना बोलावणार का? यावर राज ठाकरेंनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

Raj Thackeray: काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना मोर्चात बोलावणार का? राज ठाकरेंनी दिलं एका वाक्यात उत्तर
Raj Thackeray
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 12:34 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महामोर्चा आहे. या मोर्चामध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्ष देखील सहभागी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. आज राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महामोर्चा काढण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना मोर्चात बोलावणार का? यावर एका वाक्यात उत्तर दिले आहे. “निमंत्रण देण्यासाठी प्रत्येकाला फोन केले जातील. कोणतेही पत्र पाठवण्यात येणार नाही. फोनवर बोलणं होईल”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Loading...

प्रत्येकाने आंदोलन करावं

काँग्रेसने वेगळं आंदोलन केलं. सीजेपी वेगळं आंदोलन करत आहे. याबाबतही राज यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. हा स्पर्धेचा विषय नाही. ज्याला जसं वाटेल त्याने तसं आंदोलन करावं. जास्तीत जास्त आंदोलने झाली पाहिजे. हा काही स्पर्धेचा विषय नाही. उद्या एखाद्या सोसायटीनेही आंदोलन करायचं ठरवलं तरी हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

त्यांना का त्रास होतोय?

निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधक बोलत असताना सत्ताधारी मात्र निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं समर्थन करत आहेत. त्यावरही राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. आम्ही निवडणूक आयुक्तांवर बोलतोय. त्यांना का त्रास होतोय, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे खाई त्याला खवखवे अशी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कसा असणार मोर्चा?

येत्या 4 ऑक्टोबर रोजी आमचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. 4 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वजण भायखळ्याच्या रिचर्डसन आणि क्रुडास कंपनीजवळ जमतील. तिथून 11 ते 11.30 वाजेच्या दरम्यान मोर्चा निघेल. हा मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ येईल. या ठिकाणी व्यासपीठ उभारलं जाईल. तिथेच सभेत रुपांतर होऊन मोर्चाची सांगता होणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

४ ऑक्टोंबर २०२६ रोजी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटही हजर राहणार आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी ठाकरेंच्या मोर्चाचे आमंत्रण आले तर विचार करू असे विधान केले होते. त्यावर आता राज ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us