Rajya Sabha Election 2022: धूरंदर, राजस्थानच्या राज्यसभा निवडणुकीत गहलोतांनी ते केलं ज्याचा भाजपानं विचारही केला नाही, वाच काय घडलं?

| Updated on: Jun 10, 2022 | 2:37 PM

मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित्त करणार. भाजपकडून त्यांचेच नेते सांभाळले जात नाहीत. अन वरून बाहेरच्या लोकांना बोलवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

Rajya Sabha Election 2022: धूरंदर, राजस्थानच्या राज्यसभा निवडणुकीत गहलोतांनी ते केलं ज्याचा भाजपानं विचारही केला नाही, वाच काय घडलं?
Ashok Gehlot
Image Credit source: Tv9
Follow us on

जयपूर – राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणूक 2022(Rajya Sabha Election 2022) साठी मतदान सुरु आहे. याच वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी आपल्या राजकीय रणनीतीने भाजपाला धक्का दिला आहे . तर झाले असे की आज मतदान सुरु झाल्यांनंतर मुख्यमंत्री गहलोत यांनी भाजपला कल्पनाही करता येणार नाही अशी बाजी खेळली. मतदानाला सुरुवात झाल्या झाल्या त्यांनी पाहिल्यांदा बसपाच्या त्या सहा आमदारांचे प्रथम मतदान करून घेतले. जे सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) जाणार होते.मात्र त्याच्या या खेळीची भनक देखील भाजपाला लागली नाही. यावर माध्यमांशी बोलताना गहलोत म्हणाले की आमच्या नियोजनात या गोष्टीचा समावेश होता. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. चारपैकी चौथ्या जागेसाठी सर्वात जास्त चुरस इथे पहायला मिळत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

प्रामुख्याने बसपा पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत हे प्रकरण उच्च न्यायालयातही मांडण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे नेते सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती.मात्र त्यापूर्वी बसपाचे सहा आमदार विधानसभेत मतदान करतील, असे ठरले होते. तश्या सूचनाही या आमदारांना देण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे या आमदारांनी मतदानासाठी सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या गेल्या होत्या.

असे केले मतदान

प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी मतदान केले. त्यानंतर लगेच बसपाच्या या सहा नेत्यांनी मतदान केले. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात आला तरी त्यांच्या मताचा निवडणुकीत विचार केला जाईल. यावर बोलताना मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की निवडणुकीत भाजपात चारी मुंड्या चित्त करणार भाजपकडून त्यांचेच नेते सांभाळले जात नाहीत. अन वरून बाहेरच्या लोकांना बोलवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. चारपैकी चौथ्या जागेसाठी सर्वात जास्त चुरस इथे पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा