AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale : अजून सरकारचा नाही पत्ता पण आठवलेंना आत्तापासून हवा मंत्र्याचा भत्ता, 170 आमदार महायुतीसोबत असल्याचाही दावा

रिपाईचे नेते रामदार आठवलेही (Ramdas Athawale) आज गुडघ्याला बाशिंग बांधू बसल्याचे दिसून आले. कारण नव्या सरकारमध्ये आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी थेट मागणीच रामदास आठवलेंनी भाजपकडे केली आहे. 

Ramdas Athawale : अजून सरकारचा नाही पत्ता पण आठवलेंना आत्तापासून हवा मंत्र्याचा भत्ता, 170 आमदार महायुतीसोबत असल्याचाही दावा
मनसेला मंत्रिमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान हवं, आठवलेंची मागणीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 23, 2022 | 9:10 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाने महाविकास आघाडी सरकारवर सध्या टांगती तलवार आहे. तिकडे एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. एकनाथ शिंदेही भाजपला (BJP) पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करताना दिसून येत आहे. तर इकडे महाविकास आघाडीचे नेते हे सरकार टिकेल असा दावा करत आहेत. आम्ही बहुमतही सिद्ध करून असेही महाविकास आघाडीचे नेते ठासून सांगत आहेत. मात्र काही भाजप समर्थक मित्र पक्षांना सत्ता बदलाची इतकी घाई झाली आहे. की अजून सरकार बदलाचा पत्ता नाही. तोपर्यंत यांनी आपल्या मागण्या पुढे करायला सुरू केल्या आहेत. रिपाईचे नेते रामदार आठवलेही (Ramdas Athawale) आज गुडघ्याला बाशिंग बांधू बसल्याचे दिसून आले. कारण नव्या सरकारमध्ये आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद हवं अशी थेट मागणीच रामदास आठवलेंनी भाजपकडे केली आहे.

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद हवं…

सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य  करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकतात. त्यांनी आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना द्यावे, असे म्हणतानाच 170 आमदार महायुतीसोबत असल्याचा दावाही केला आहे. आठवले हे एवढ्यावर थांबले नाहीत. तर त्यांनी संजय राऊतांवर टीकेचे बाण चालवले तर एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाची फुलंही उतळली आहेत. शिवसेनेच्या या परिस्थितीला आज संजय राऊत जबाबदार आहेत, त्यांच्यामुळेच सेना बूडाली आहे, असे म्हणत आठवलेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तर एकनाथ शिदेंनी मोठी डेरिंग केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होईल, त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये एक मंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी आहे, अशी थेट मागणीच त्यांनी भाजप नेत्यांपुढे ठेवली  आहे.

रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट

रवी राणा यांचे कार्यकर्तेही चेकाळले

राज्यातल्या सध्याच्या राजकीय ड्राम्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांचे कार्यकर्तेही चांगलेच सक्रिय झाले नाही. नव्या सरकारचा अजून पत्ताही नाही. तोपर्यंत रवी राणा यांच्या नावापुढे कॅबिनेट मंत्री असे लिहिलेल्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहे. नुसते कॅबिनेट मंत्रीच नाही तर अमरावतीचे पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा अशाही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे कार्यकर्तेही आधीच गुडघ्याला बाशिंगा बाधून बसले आहेत. पण राजकारणात एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत त्याबाबत अंदाज लावता येत नाही, याचा विसर या कार्यकर्त्यांना पडल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट