राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल, ईडीच्या कारवाईवरुन आठवलेंचा पलटवार

| Updated on: Nov 25, 2020 | 5:07 PM

आमची चौकशी खुशाल करा, जे असेल ते बाहेर येईल असे म्हणत, संजय राऊतांना रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Ramdas Athawale on ED raid)

राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल, ईडीच्या कारवाईवरुन आठवलेंचा पलटवार
Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ईडीच्या या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आमची चौकशी खुशाल करा, जे असेल ते बाहेर येईल असे म्हणत, राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. (Ramdas Athawale on ED raid in Maha vikas Aghadi)

“शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे चांगले उद्योजक आहेत. त्यांनी जर काही केलं नसेल, तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी शासकीय यंत्रणांना तपास करु द्यावा, असे आठवले म्हणाले. तसेच, या यंत्रणा कोणाच्याही विरोधात नाहीत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी आम्हा या यंत्रणांचा वापर करत नाहीयेत. संजय राऊत म्हणतात आमच्याही चौकशा करु, त्यांनी जरुर चौकशी करावी. जे सत्य असेल ते बाहेर येईल, असे आठवले म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका.” असे वक्तव्य संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले होते.

कुणीही वीजबिल भरु नये

राज्यात वीजबिलाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका होत आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलात सुट द्यावी अशी मागणी केली जात आहे. या मुद्द्यावरुन आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने वाढीव वीजबिल जनतेवर लादू नये, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. तसेच, जनतेने वाढीव वीजबिल भरु नये, कुणी विजेची जोडणी तोडायला आले, तर त्यांना नागरिकांनी विरोध करावा असेही, आठवले म्हणाले.


संबंधित बातम्या :

भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले

ईडीचं उत्खनन हडप्पा-मोहेंजोदारोपर्यंत, ईडीच्या नोटीसची वाट पाहतोय, संजय राऊतांचा टोला

जेवढ्या चौकशा करायच्या तेवढ्या करा, महाराष्ट्रातही आमची सत्ता आहे हे लक्षात ठेवा; राऊतांचा इशारा

(Ramdas Athawale on ED raid in Maha vikas Aghadi)