सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावर रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले….

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे...

सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावर रणजीत सावरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले....
| Updated on: Nov 20, 2022 | 3:05 PM

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi Statement) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर असं विधान कुणी केला असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याबद्दलचा खुलासा सुद्धा भविष्यात येईल, असं मला वाटतं, असं रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पत्र लिहिली होती, तो त्यांच्या रणनीतीचा भाग होता. ते त्यांनी सिद्धही केलं होतं. त्यामुळे अशी विधानं करणं चूक आहे, असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.

सुधांशू त्रिवेदी यांचं विधान काय?

“औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली”, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सुधांशू त्रिवेदी यांचं हे जुनं विधान आहे. आजतक या वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय.

त्रिवेदी यांच्या या विधानाचा सगळेच निषेध करत आहेत. आता कॉग्रेसही निषेध करत आहे.काँग्रेस शिवरायांना राज्यपुरूष मानतंय याचा मला आनंद आहे, असंही रणजीत सावरकर म्हणालेत.

भाजपने हा अपमान केलाय, असं मला वाटतं नाही. भाजपचा कार्यकर्ता शिवाजी महाराजांचा अपमान करणार नाही. सुधांशू यांचं वक्तव्य चुकीचं आहे. महाराजांची काही पत्र आहेत. पण ती स्टॅटर्जीचा भाग आहेत, असं रणजीत म्हणालेत.