Ranjit Naik-Nimbalkar : राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस, रणजिंतसिंह निंबाळकरांचं मोठं वक्तव्य

जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

Ranjit Naik-Nimbalkar : राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस, रणजिंतसिंह निंबाळकरांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 18, 2022 | 11:15 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP)  पाच मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस येणार असल्याचे भाजपचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकरांचं (Ranjit Naik-Nimbalkar)  मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकारणात घडामोडींना मोठा वेग आला आहे. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती ईडीची (ED) कारवाई होणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे. सरकारला काय वाटत हे सर्वात महत्वाचं आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक चोर आहेत त्यातला कोणता चोर त्यांना सापडला आहे हे मोहित कंबोज यांच्याशी बोलल्यानंतर कळलं असं वक्तव्य भाजपचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकरांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होऊ शकतो

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होऊ शकतो. लवकरच राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याला अटक होऊ शकते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर तपासाचा झोत कोणत्या नेत्यापर्यंत पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. ते म्हणाले होते की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. त्यामुळे पाच नेत्यांना ईडीची नोटीस जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचा नंबर

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याला अटक केल्याच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे की, लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख असल्याने कंबोज यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडताना त्यांचा खुलासा होताना दिसत आहे.

काय आहे मोहित कंबोजचा दावा ?

लवकरच पत्रकार परिषद घेऊन या नेत्याबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत खुलासा करणार असल्याचे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देश-विदेशात मालमत्ता, बेनामी कंपनी, महिला मित्राच्या नावावर मालमत्ता, मंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार केला. तसेच कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तेची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. मात्र, मोहित कंबोज मोठा खुलासा कधी करणार हे ठरलेले नसून, कंबोज यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापू लागले आहे.