
शरदचंद्र पवार राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावरुन केंद्र सरकारच समाचार घेतला होता. अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी आता ठाण्यात येऊर येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी झाल्याचा आरोप केला आहे. येऊरच्या या हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. सगळ्या प्रकारचे ड्रग्ज या पार्टीमध्ये उपलब्ध होते. अनेक मोठ्या ड्रग पेडलर्सचा या पार्टीत मुक्त संचार सुरु होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरु होती, असं दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. या भागात वाहतूक कोंडी मॅचमुळे नव्हे, तर रेव्ह पार्टीमुळे झाली होती. 80 टक्के लोक मुंबईतून आले होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
‘कोणाच हॉटेल कुठे आहे? त्यांना कसं वाचवल जातय’
“संजय गांधी नॅशनल पार्कमधून येऊरमध्ये प्रवेश करण्यात आला. हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे. पोलीस, वनखात्याला कारवाई करावी लागेल. प्रशासन आणि हॉटेल मालकाच साटंलोटं आहे” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “विधानसभेत मी यावर बोलणार आहे. कोणाच हॉटेल कुठे आहे? त्यांना कसं वाचवल जातय” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “सुधीर मुनंगटीवर आणि आदिवासींची संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी वन खात्याला 6 वाजता दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले होते” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
No fear …
A #Raveparty was organised in #Yeoor in one of the famous hotels in #yeoor.All kinds of #Drugs were available all top peddlars were also moving freely.The cover was #worldcup2024
The reason for traffic was not due to match it was due to the rave party.
80% crowd was…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 30, 2024
मुख्यमंत्र्यांचा इशारा काय?
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब, बार यांच्याविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. अनधिकृत पब, बारवर हातोडा चालवला जातोय. “ड्रग्जची पाळमुळं उखडून फेकण्याच काम पोलीस, प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका करतय. पेडलर, मोठे सप्लायर असतील, कोणी कितीही मोठा माणूस असेल तरी सोडणार नाही. सरकार डोळ्यासमोर तरुणपिढी बरबाद होऊ देणार नाही. शहर, राज्य ड्रग्ज मुक्त होत नाहीत, तो पर्यंत बुलडोजर, तोडफोड कारवाई सुरु राहील” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.