भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?

| Updated on: Jan 01, 2020 | 5:50 PM

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे रोहन बने तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे.

भास्कर जाधवांच्या नाराजीचे पडसाद रत्नागिरी झेडपी अध्यक्ष निवडणुकीत?
Follow us on

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे रोहन बने तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रोहन सुभाष बने, महेश म्हाप, विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) आणि उदय बने यांची नावे आघाडीवर होती. विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत. भास्कर जाधवांनी मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी उघड केली होती. त्या नाराजीचे पडसाद आज या निवडीतही पाहायला मिळाली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. या पदासाठी ‘मातोश्री’वरुन रोहन बने यांचे नाव निश्चित करण्यात करण्यात आले. त्यानुसार अध्यक्षपदी रोहन बने तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या नाराजीचे सूर इथं सुद्धा पहायला मिळाले.

कारण मंत्रिमंडळ विस्तारावर भास्कर जाधवांनी नाराजी दर्शवल्यानंतर त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे आजच्या निवडीसाठी हजरच राहिले नाहीत.

आज तब्बल 22 वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी पडले होते. मात्र या निवडीसाठी सुद्धा जाधवांचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले. विक्रांत जाधव अनुपस्थित राहिल्याने त्यांचीही नाराजी आहे का ? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद पक्षीय बलाबल

  • शिवसेना- 39
  • राष्ट्रवादी- 16

भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत जाधवांनी अजून शिवसेनेत प्रवेश केला नाही. ते राष्ट्रवादीत आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहन बने यांच्या वाढदिवसाला आमदार उदय सामंत यांनी जातीने भेट घेत, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आमदार उदय सामंत यांचा दबदबा कायम राखण्यात यश आलं आहे.