Rohit Patil | राष्ट्रवादीने 2024 च्या निवडणुकीसाठी तासगावचा उमेदवार ठरवला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले.

  • Updated On - 10:49 am, Mon, 2 September 19
Rohit Patil | राष्ट्रवादीने 2024 च्या निवडणुकीसाठी तासगावचा उमेदवार ठरवला

Rohit Patil सांगली : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने आगामी 2019 च्या विधानसभेच्या तयारीसाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. राज्याच्या विविध भागात ही यात्र जात आहे.  ही यात्रा काल स्वर्गीय आर आर पाटील (R R Patil) यांच्या सांगली जिल्ह्यात पोहोचली. आर. आर. पाटील ( R R Patil) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम काल पार पडला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी आर आर पाटलांच्या आठवणींना उजाळा दिला. जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या परवानगीने 2019 चा नव्हे तर 2024 चा तासगाव विधानसभेचा उमेदवार जाहीर केला. आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील हे 2024 मधील तासगावचे उमेदवार असतील, असं जयंत पाटील म्हणाले.

रोहित पाटील यांना उमेदवारी

जयंत पाटील म्हणाले, “आज आबा आपल्यात नाहीत. त्यांची उणीव महाराष्ट्राला जाणवतेच, मात्र सर्वाधिक उणीव राष्ट्रवादी काँग्रेसला जाणवत आहे. आज आबा असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या हृदयात हात घालून त्यांना हवं ते काम करण्याची क्षमता आबांमध्ये होती. 2019 च्या निवडणुका होतील. मला खात्री आहे की आमदार सुमनताईंच्या मागे आपली ताकद आणि पाठबळ उभा केली आहे आणि कराल. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार मी 2019 ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अद्याप जाहीर केलेला नाही. मला मगापासून मोह होतोय, त्यामुळे मी शरद पवार साहेबांची परवानगी घेऊन मी हे जाहीर करतो की 2024 चा तासगावचा आमदार हा रोहित पाटील असेल. त्यांना तिकीट देण्याचा निर्णय आमचा पक्ष आज घेईल”

आर आर आबांची पुण्याई इतकी मोठी आहे की यंदा सुमनताई पुन्हा निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आबांच्या आठवणीने शरद पवार भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, अशी भावना शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली. ते सांगलीमध्ये (Sangli) आर. आर. पाटील ( R R Patil) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

संबंधित बातम्या 

आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI