ओबीसी समाजात अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना शोधलं पाहिजे : रोहित पवार

| Updated on: Jan 25, 2021 | 12:04 AM

ओबीसी समाजात वेगळ्या प्रकाराचा अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांना शोधले पाहिजे," असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.

ओबीसी समाजात अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना शोधलं पाहिजे : रोहित पवार
Rohit Pawar
Follow us on

जळगाव : “मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणातून आम्हाला हक्क पाहिजे असं कोणीही बोलत नाही. मात्र काही जण ओबीसी समाजात वेगळ्या प्रकाराचा अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांना शोधले पाहिजे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. आमदार रोहित पवार जळगाव दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली (Rohit Pawar comment on OBC Reservation and Maratha Reservation fight).

ओबीसींमध्ये आरक्षणप्रश्‍नी आक्रमकता वाढते आहे. या प्रश्‍नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “आम्हाला दुसऱ्या समाजातून आरक्षण पाहिजे असं कुणीही बोललेले नाही. मात्र ओबीसी समाजामध्ये काही लोक अपप्रचार करत असतील तर अशा लोकांना शोधले पाहिजे. ते असे का करत आहेत ते त्यांना विचारलं पाहिजे. आपल्या देशात सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे राहत आहेत. परंतु अशा प्रकारे जर कुणी अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करत असेल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे.”

“मराठा आरक्षण प्रश्‍नी खंडपीठात जी सुनावणी सुरू आहे, ती ऑनलाईन पध्दतीने न होता, समोरासमोर व्हावी अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाकडे केलीय. राज्य सरकारची विनंती न्याय व्यवस्था मान्य करेल असा आपल्याला विश्‍वास वाटतो,” असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

‘शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नवे कृषी कायदे’

रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन आणि मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “केंद्र सरकारने विधीमंडळात कायदा मंजूर केला. मात्र तो समितीकडे पाठवायला पाहिजे होता. त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सदस्य असताना त्यांनी ते देखील केले नाही. केंद्राने शेतकऱ्यांना, जनतेला विश्‍वासात घेतले नाही.”

हेही वाचा : 

रोहित पवार का म्हणतात राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले?

महाराष्ट्र, पंजाब ,तामिळनाडू कुठलाही शेतकरी असो , त्यांना सन्मानाची वागणूक द्या, रोहित पवारांचे केंद्राला खडे बोल

औरंगाबादच्या नामांतरावरुन रोहित पवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

व्हिडीओ पाहा :

Rohit Pawar comment on OBC Reservation and Maratha Reservation fight