युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

| Updated on: Jul 12, 2020 | 12:20 PM

पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या ऋतुराज पाटील यांनी भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता.

युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी
Follow us on

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेतील युवा आमदार ऋतुराज पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. युवा वर्गात ऋतुराज यांची मोठी क्रेझ पाहायला मिळते. ऋतुराज पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Ruturaj Patil appointed as General Secretary Of Maharashtra Pradesh Youth Congress)

ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या ऋतुराज पाटील यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार अमल महाडिक यांचा तब्बल 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला होता.

ऋतुराज पाटील यांना समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. ऋतुराज हे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. सतेज पाटलांनी गेल्या वर्षी धडाक्यात आपल्या पुतण्याचे लाँचिंग केले होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आमदारपदी वर्णी लागल्यापासून ऋतुराज पाटील कोल्हापुरात वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. कोल्हापुरातील युवक वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नव्या कार्यकारीणीची घोषणा केली. आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी ऋतुराज पाटील यांची निवड झाल्याने समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.

निवडणुकीवेळी ऋतुराज पाटील यांनी पाच हजार झाडे लावण्याचे आश्वासन दिले होते. तर कोल्हापुरात एक हजार तरुणांना नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. यांची लवकरच पूर्तता करणार असल्याचं ते सांगतात.