Saamana : ईडीने आता पं. नेहरुंना नोटीस बजावली तरी आश्चर्य वाटायला नको, सामना अग्रलेखातून सेनेचा टोला

स्वातंत्र्य लढ्यात जहाल मुखपत्र म्हणून हेराल्डची ओळख होती. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात काय सुरु आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी लोक हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते.

Saamana : ईडीने आता पं. नेहरुंना नोटीस बजावली तरी आश्चर्य वाटायला नको, सामना अग्रलेखातून सेनेचा टोला
सामना अग्रलेखातून सेनेचा टोलाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 8:39 AM

मुंबई – नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (ED) सोनिया (Sonia Gandhi) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बाजावली आहे. आता या प्रकरणात खुद्द पंडित नेहरूनांचं नोटीस बजावून त्यांच्या स्मारकावर ती चिकटवली तरी आश्चर्य वाटायला नको! हेराल्ड म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे हत्यार होते. नेहरुंनी ते निर्माण केलं. ती फक्त संपत्ती नव्हती. राजकारणातील सध्याच्या व्यापाऱ्यांना हे कधी समजणार? अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून कऱण्यात आली आहे. नॅशनल हेराल्डचे राजकीय महत्त्व अद्याप कमी झालेलं नाही. पण त्यावरून देशात राजकारण सुरू आहे. नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र पंडित नेहरूंनी सुरू केले होते. ते वृत्तपत्र सुरू करण्यामागे इंग्रजांना देशातून हाकलून देणे हा हेतू होता. विशेष म्हणजे महात्मा गांधी व सरदार पटेल हे या वृत्तपत्राच्या मुख्यस्थानी होते.

जहाल मुखपत्र म्हणून हेराल्डची ओळख होती

स्वातंत्र्य लढ्यात जहाल मुखपत्र म्हणून हेराल्डची ओळख होती. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात काय सुरु आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी लोक हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. नेहरूंच्या या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका भयानक धसका घेतला की, त्यांनी 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेराल्डवर इंग्रजांनी बंदीच घातली होती. 1945 पर्यंत या वृत्तपत्रावर बंदी होती. त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हेराल्ड वृत्तपत्राची निर्मिती झाली. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणाऱ्यांसाठी ते एक हत्यार होते. तो पैसे कामावण्याचा धंदा नव्हता. आता या वृत्तपत्रातील गैरव्यवहार प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. ज्यावेळी इतर वृत्तपत्र एकेरी वात्तांकन करीत होती. त्यावेळी या वर्तमानपत्राने देशासाठी योग्य कामगिरी केली आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता

‘नॅशनल हेराल्ड’ वर्तमान पत्राविषयी अनेकांना जास्त माहिती नाही. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या लोकांनाही याबाबत अधिक माहिती नाही. नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते त्यामध्ये नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता. नेहरू आक्रमक असल्याने कोणत्याही टिकेला घाबरत नव्हते. त्या वर्तपत्राचे अनेक किस्से आहेत.

हे सुद्धा वाचा

स्वातंत्र्य काळात योग्य भूमिका निभावलेल्या वर्तमान पत्राविषयी आम्हाला आदर आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ने त्याच स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.