AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, आता ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन दिल्लीत येतील काय?”

आऊट ऑफ कंट्रोल ' म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे , असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे.

अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, आता 'बहिष्कृत' ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन दिल्लीत येतील काय?
| Updated on: Dec 23, 2020 | 6:42 AM
Share

मुंबई : आऊट ऑफ कंट्रोल ‘ म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे , असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. ब्रिटनसारख्या देशातील भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्राने सावधगिरीचा उपाय बाळगला असल्याचं आजच्या (बुधवार) सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial On Britain New Corona Strain)

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे. ब्रिटनमधील विषाणूचा धसका असा की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-ठाणे-पुणेसारख्या शहरांना मोठी आर्थिक झीज सोसावी लागेल, पण सावधगिरीचा उपाय म्हणून ही कठोर पावले उचलावीच लागणार आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले. प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील 26 जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सनसाहेब प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचे, हा प्रश्नच आहे”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. देश सतर्क आहे. त्याचवेळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकॉक म्हणतात, नवा कोरोना व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असून तो वेगाने हल्ला चढवतो. त्याची संसर्ग क्षमता आधीच्या विषाणूपेक्षा 75 टक्के जास्त आहे. ही माहिती मन विषण्ण करणारी आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्यमंत्रीनी काहीही म्हटलं असलं तरी चिंता करावी लागेलच, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

भारताला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात? ‘आऊट ऑफ कंट्रोल’ म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत. ऑस्ट्रेलियात नव्या कोरोना विषाणूचे 83 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तेथील अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच, काळजी करावी अशी परिस्थिती नव्याने निर्माण झाली असल्याचं मत अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

“महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करून सावधानता बाळगली, पण दुसऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय आला. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही”, असं सरतेशेवटी अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा :

‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’

राम मंदिर आंदोलनातील राजकीय घुसखोर कोण आहेत ते कळू द्या; शेलारांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.