Eknath Shinde: संशयी वातावरण झालेलं आहे, काही आमदारांशी संपर्क नाही हे खरं, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे हे सध्या सुरतमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार देखील आहेत. शिवसेनेत फूट पडल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकरणावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde: संशयी वातावरण झालेलं आहे, काही आमदारांशी संपर्क नाही हे खरं, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:31 AM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शिंदे हे सुरतच्या हॉटेल  ली-मेरिडिअनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shiv Sena) काही आमदार देखील आहेत. आज बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिवसेनेत फूट पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर येत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. जसे चित्र निर्माण केलं जात आहे. तसं काही भूंकप वगैरे काही नाही. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हा पॅटर्न चालणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेवर घाव म्हणजे महाराष्ट्रावर घाव

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या पद्धतीने तुम्हाला  किंगमेकर होता येणार नाही. महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं होय. जे  बाहेर पडले त्यांची अवस्था आपण आज पाहतोय. अनेक आमदार आत्ता वर्षावर येत आहेत. अनेक नावं आम्ही पाहतोय. जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार सुरतमध्ये आहेत. आमदारांची व्यवस्था भाजप नेते आरसी पाटील करत आहेत. सुरतलाच का नेलं? ज्या क्षणी आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील. आमच्यासोबत भाजपाला लढावं लागेल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्याशी लढावं लागेल. एकनाथ शिंदे कालपर्यंत होते. ते शिवसेनेच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. ते आमचे जीवाभावाचे सहकारी तसेच कडवट निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

गैर समज दूर करू

मुख्यमंत्री अनेक खात्यांचा आढाव घेत असतात, त्यातून काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू.माझं आणि शरद पवारांचं बोलण सुरू आहे. पवार आत्ता दिल्लीत पोहोचतील. उद्धवजी मला म्हणाले इथेच थांबा, म्हणून मी इथे आहे. पक्षप्रमुखाच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. राजकारणात अशा प्रसंगांना समोर जावं जागतं. भाजपने आधीही एक प्रयोग केला. तो यशस्वी झाला नाही, म्हणून थांबून हा दुसरा घाव पाठीवर घातला आहे. आम्ही छातीवर घाव घेणारे आहोत. एकनाथ शिंदेंचं आयुष्य हे शिवसेनेत गेलं आहे, सर्व आंदोलनात ते बरोबर होते. बाळासाहेबांबरोबर होते. ते दबाव आणत आहेत. अनिल परबांना आजच ईडीची नोटीस का? हे समजून घेतलं गेलं पाहिजे, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.