एकनाथ शिंदेंनी वारंवार पक्षनिष्ठा सिद्ध केली तरीही त्यांच्यावर संशय; उद्धव ठाकरेंचे पक्षावर नियंत्रण नाही – बोंडे

भाजप नेते अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंवर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर संशय घेणे शिवसेनेला भोवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंनी वारंवार पक्षनिष्ठा सिद्ध केली तरीही त्यांच्यावर संशय; उद्धव ठाकरेंचे पक्षावर नियंत्रण नाही - बोंडे
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी अनिल बोंडेंकडून धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:51 AM

अमरावती: विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. शिनसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे (Shiv Sena) तेरा आमदार देखील आहेत. सध्या शिंदे हे सुरतमधील हॉटेल  ली-मेरिडिअनमध्ये वास्तव्याला आहेत. हॉटेलबाहेरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी वांरवार पक्षनिष्ठ सिद्ध केली आहे. मात्र तरी देखील त्यांच्यावरच संशय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्यावर संशय घेणे हे शिवसेनेला भोवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे कट्टर हिंदुत्त्वाचे पुरस्कर्ते आहेत अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना आपले आमदार सांभाळता येत नाहीत. त्यांचे आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण नाही. उद्धव ठकेर यांचे त्याच्या घटक पक्षांवर देखील नियंत्रण नसल्याचे बोंडे यांनी म्हटले आहे. यावेळी अनिल बोंडे यांना विधानपरिषद निकालाबाबत विचारले असता, ज्यांचा पराभव झाला त्यांनी योगा करावा अशी मिश्किल टीपणी देखील त्यांनी यावेळी दिली.

हे सुद्धा वाचा

राजकीय हालचालींना वेग

एकनाथ शिंदे हे काल सांयकाळपासून नॉटरिचेबल आहेत. ते सुरतच्या  हॉटेल  ली-मेरिडिअनमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तेरा आमदार देखील आहेत. एकनाथ शिंदे हे आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे नेमकं काय करणार भाजपमध्ये प्रवेश करणार की, वेगळ्या पक्षाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे नॉटरिचेबल असल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. छगन भुजबळ हे नाशिकहून मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तण होणार का? हे पहाणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.