ऊसाची FRP एकरकमी देणार, राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याची मोठी घोषणा

| Updated on: Oct 11, 2021 | 6:40 PM

कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही. मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य असल्याचंही घाटगे यांनी म्हटलंय. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.

ऊसाची FRP एकरकमी देणार, राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याची मोठी घोषणा
समरजीत घाटगे, भाजप नेते
Follow us on

कोल्हापूर : ऊस FRP च्या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजप नेते समरजित घाटगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. निर्णय काहीही होऊ दे, ऊसाची एफआरपी एकरकमी देणार अशी घोषणा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याने केली आहे. (Samareet Ghatge’s announcement of Rajarshi Shahu Maharaj Sugar Factory to give one-time FRP of sugarcane)

महापुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलं. राज्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे. कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही. मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य असल्याचंही घाटगे यांनी म्हटलंय. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.

FRP च्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

‘प्रत्येक विषय केंद्रावर ढकलला जात आहे. केंद्र सरकारनं परवा लेखी स्पष्ट केलं की एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा आमचा हेतू नाही. हा निर्णय राज्यानं करायचा आहे. म्हणजे तुमच्या मंत्रिमडळात तीन चतुर्थांश मंत्री साखर कारखानदार. त्यांना एफआरपीचे तीन तुकडे करायचे आहेत. म्हणून तुम्ही केंद्राकडे बोट दाखवता. केंद्रानं स्पष्ट केलंय की आम्हाला एफआरपीचे तीन तुकडे करायचे नाहीत. मी समरजीत घाटगे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मी एफआरपी एकरकमी देणार असल्याचं घोषित केलं. आता मुश्रीफांनी, बंटी पाटलांनीही घोषित करावं की एफआरपी एकरकमी देणार. मग कळेल की शेतकऱ्यांबद्दल कुणाला कळवळा आहे’, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे.

शरद पवारांची भूमिका काय?

मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. उसाला एक रकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या अस म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, असं शरद पवार सोलापुरात बोलताना म्हणाले.

इतर बातम्या :

‘आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम, लातूरच्या आंदोलक शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष’

आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

Samareet Ghatge’s announcement of Rajarshi Shahu Maharaj Sugar Factory to give one-time FRP of sugarcane