आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
रुपाली चाकणकर, अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 4:18 PM

मुंबई : लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Rupali Chakankar responds to Amrita Fadnavis’s criticism)

अमृता फडणवीस या सक्रीय राजकारणात नसल्या तर त्या ट्वीटर किंवा अन्य माध्यमातून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केलाय.

अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.

देवेंद्र फडणवीसांचा पवारांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. इतकंच नाही तर आपण हे वक्तव्य केल्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याचा आरोपही पवारांनी केलाय. पवारांच्या या आरोपाला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्नही फडणवीसांनी विचारलाय.

इतर बातम्या :

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी

Rupali Chakankar responds to Amrita Fadnavis’s criticism

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.