मतदारसंघ शिवसेनेचा, मुश्रीफांविरोधात भाजप नेत्याच्या प्रचाराचा शुभारंभ

मतदारसंघ शिवसेनेचा, मुश्रीफांविरोधात भाजप नेत्याच्या प्रचाराचा शुभारंभ

जागांच्या अदलाबदली मध्ये ही जागा भाजपला मिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावर अधिकृत निर्णय झाला नसतानाच समरजितसिंह घाटगे यांनी रणशिंग फुंकल्याने राजकारणाचं विद्यापीठ असलेलं कागल पुन्हा चर्चेत आलं आहे.

सचिन पाटील

|

Sep 13, 2019 | 5:11 PM

कोल्हापूर : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याआधीच कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह (Samarjit Singh Ghatge) यांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यांच्या (Samarjit Singh Ghatge) परिवर्तन संकल्प मेळाव्याला कागलमधून सुरुवात झाली. विशेष म्हणजे युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे.

जागांच्या अदलाबदली मध्ये ही जागा भाजपला मिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावर अधिकृत निर्णय झाला नसतानाच समरजितसिंह घाटगे यांनी रणशिंग फुंकल्याने राजकारणाचं विद्यापीठ असलेलं कागल पुन्हा चर्चेत आलं आहे.

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्य पातळीवर पक्षाच्या जोर बैठका सुरू झाल्यात. मात्र अजून कोणाचा फॉर्म्युला काय आणि कोणा सोबत कोण असेल हे नक्की झालेलं नाही. मात्र तरीही इच्छुक उमेदवार मात्र बाशिंग बांधून तयार असल्याचं दिसतंय. पुणे म्हाडा आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी परिवर्तन संकल्प यात्रेने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. कागलमधील रॅली काढत त्यांनी शक्तीप्रदर्शनही केलं. धनगरी ढोल आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांनी या प्रचाराला सुरुवात केली.

युतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कागलची जागा भाजपलाच मिळेल असा विश्वास यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि आता कागलमध्येही भाजप असेल असं सूचक विधान त्यांनी केलं.

समरजितसिंह घाटगे यांच्या शक्तीप्रदर्शनाने शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची अस्वस्थता वाढवली आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पुन्हा एकदा या राजकीय विद्यापीठानेच केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें