शिवसेनेच्या संजय राठोडांचे खातं काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

| Updated on: Jan 10, 2020 | 4:12 PM

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे." असे संजय राठोड (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) म्हणाले. 

शिवसेनेच्या संजय राठोडांचे खातं काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर
Follow us on

मुंबई : राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. दुय्यम दर्जाचे खाते मिळाल्याने वडेट्टीवार नाराज (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) होते. त्यामुळे त्यांना भूकंप पुनर्वसनऐवजी मदत पुनर्वसन खातं दिलं जाणार आहे. याबाबत संजय राठोड यांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. “मंत्रिमंडळ हे टीम वर्क आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.” असे संजय राठोड (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) म्हणाले.

“मंत्रिमंडळ हे टीम वर्क आहे. आमच्या टीमचे कप्तान हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. खातं कोणतं असावं त्यापेक्षा मी त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे आहे. मी मंत्रिमंडळात असणे हे माझे नशीब समजतो.” असेही संजय राठोड म्हणाले.

“मदत पुनर्वसन खातं कोणत्या एका सहकारी मंत्र्याला दिलं तर तिथं चांगला काम होईल. जर ते माझ्याकडे राहिलं, तरी मी त्यावर चांगलं काम करेन. पण काहीही असलं तरी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे,” असेही राठोड यावेळी म्हणाले.

“राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शेतकऱ्याला आणि सर्वसामान्याला दिलासा देण्यासाठी आम्ही काम करणार आहेत. तसे  शेतकरी हा सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून काम करण्याची तयारी आहे.” असेही संजय राठोड यावेळी (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) म्हणाले.

काँग्रेसचे नाराज कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना यश आलं आहे. दिल्लीतील नेत्यांशी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलणं करुन दिल्यानंतर वडेट्टीवारांच्या नाराजीचा तिढा सुटला.

“माझ्या नाराजीचा विषय नव्हता. काँग्रेसच्या वाट्याला आलेलं खातं शिवसेनेकडे गेलं होतं. मदत आणि पुनर्वसन हे सर्वसामान्य माणसाशी संबंधित खातं आहे. ते शिवसेनेकडे गेलं होतं,” असं विजय वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, मदत पुनर्वसन या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं (Sanjay Rathod comment after Vijay Wadettiwar take charge) आहे.

संबंधित बातम्या : 

पक्षावर नाराज नव्हतो, विजय वडेट्टीवारांनी कारण सांगत पदभार स्वीकारला

विजय वडेट्टीवारांबाबत ‘त्या’ शब्दामुळे चूक झाली : अजित पवार

थोरातांची आयडिया चालली, विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर