सामनातून तिरकस बाण मग राऊत आता का म्हणाले, नाना सर्वांनाच प्रिय!

| Updated on: Feb 06, 2021 | 10:17 AM

नाना पटोलेंचा काँग्रेसला संजिवनी देण्याचा उत्साह महत्वाचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.Sanjay Raut Nana Patole

सामनातून तिरकस बाण मग राऊत आता का म्हणाले, नाना सर्वांनाच प्रिय!
संजय राऊत नाना पटोले
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर तिरकस बाण चालवले होते. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतना नाना पटोले यांच्यावर सामनातून टीका केलेली नसल्याचं म्हटलंय. नानांच्या क्षमेतेचे कौतुक केल्याचं ते म्हणाले. संजय राऊत नाना पटोले सर्वांना प्रिय आहेत, असंही म्हणाले. (Sanjay Raut comment on Maharashtra State Congress President Nana Patole)

नाना पटोलेंवर टीका केलेली नाही उलट त्यांचं कौतुक केलं आहे. नाना पटोलेंचा काँग्रेसला संजिवनी देण्याचा उत्साह महत्वाचा आहे. काँग्रेस देशात सत्तेत नसला तरी महत्वाचा पक्ष आहे. काँग्रेसला परंपरा आणि इतिहास आहे. नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असले तरी त्यांच्या पक्षाला देशात संजिवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे, असं संजय राऊत यांनी सांगतिलं. पक्षांतर्गत काय परिवर्तन करायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसला पाच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं होतं. तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील हे माहित नव्हत. घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार घ्याव्या लागणं चांगल नाही. विधानसभा अध्यक्षाच्या पदावर तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल. मात्र, तीन पक्षांच्या बहुमताचं सरकार असल्यानं हे टाळायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले.

सामनामध्ये तिरकस बाण?

काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात सुचवलं आहे.

“निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे”

आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याच बरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले, असं म्हणत पटोलेंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

नाना पटोले यांच्यासोबत महाराष्ट्रासाठी टीम काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. नाना हे प्रांतिक अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल. काँग्रेसने त्यांच्या कार्याची नवी पद्धत स्वीकारली आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांचे कौतुक

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अशी झाली होती, की राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बाळासाहेब थोरातांनी जबाबदारी स्वीकारुन अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले, अशा शब्दात थोरातांचे कौतुक करण्यात आले आहे. निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची सुकलेली मुळे बहरु लागली आहेत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये”

विधानसभा अध्यक्षपदावरुन नानांना मोकळे केले आणि त्यांच्यावर पक्ष संघटनेची धुरा सोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा की महाराष्ट्रात काँग्रेसला आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये, याचा विचारही काँग्रेसने केला असेल. फटकळपणा ही नाना पटोलेंची ताकद आहे, अशा शब्दात नानांचं कौतुक केलं आहे.


संबंधित बातम्या:

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही : सामना

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

(Sanjay Raut comment on Maharashtra State Congress President Nana Patole)