Sanjay Raut | अजित पवार शपथविधीसाठी फडणवीसांसोबत गेले, त्यावर पवार बोलले; आता राऊत हसून मिश्किलपणे पहिल्यांदाच म्हणाले…

| Updated on: Dec 30, 2021 | 10:23 AM

शरद पवार यांनी मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नव्हतो असं राऊत यांनी म्हटलंय.

Sanjay Raut | अजित पवार शपथविधीसाठी फडणवीसांसोबत गेले, त्यावर पवार बोलले; आता राऊत हसून मिश्किलपणे पहिल्यांदाच म्हणाले...
SANJAY RAUT
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नव्हतो असं राऊत यांनी म्हटलंय.

त्या काळात आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती

“शरद पवार सांगत आहेत, त्यामुळे ते सत्य असावं. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती. त्यामुळे यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला. अजित पवार यांना गाठा, असे उपक्रम त्यांचे सुरु होते. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती, हे मला माहिती होते. तेही आमच्याशी बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण कोणाशी बोलतो आहे. कोण कोणाला भेटायला जात आहे, त्या काळात आमच्यात अत्यंत पारदर्शकता होती. हे भाजपला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घ्यायला गेले तेव्हादेखील आमच्यात पारदर्शकता होती,” असे संजय राऊत म्हणाले.

पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत आले

तसेच पुढे बोलताना,  राजकारणात पारदर्शकता असायला हवी. राज्यात एवढी मोठी घडामोड घडत होती. राज्यात सत्तापरिवर्तन होत होते. कोणता दगड आड येऊ नये तो कसे काढता येईल हे आम्ही करत राहिलो. आमच्याकडे तेव्हादेखील जेसीबी होती. आमच्यात पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत आले. अजितदादादेखील तेव्हा परत आले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

दिवसाचे निर्बंध आले तर महाराष्ट्राचं अर्थचक्र अडकून पडेल

तसेच आधी बोलताना त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरदेखील भाष्य केलं. “राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसाचे निर्बंध येऊ नयेत अशी आमची इच्छा आहे. दिवसाचे निर्बंध आले तर महाराष्ट्राचं अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, रोजगार यावर मोठं संकट येईल. त्यामुळे मोठं संकट उभं राहील. आपले प्रधानमंत्री मास्क लावा असं सांगतात, पण स्वत: लावत नाहीत. आम्ही त्यांचे ऐकतो. म्हणून जनतादेखील मास्क लावत नाही,” असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

इतर बातम्या :

Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप

Akshay Kardile Wedding | भाजप नेते शिवाजी कर्डीलेंच्या घरी सनई चौघडे, मुलगा अक्षय कर्डीलेंचा शाही थाटात विवाह

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया