“खयालों में जिते रहो, त्यात चार वर्ष निघून जातील”, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

| Updated on: Nov 24, 2020 | 11:16 AM

तीन महिन्यात जे सरकार बनवणार आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खयालों में जिते रहो, त्यात चार वर्षे निघून जातील, असा टोला संजय राऊतांनी लगावला. Sanjay Raut criticize BJP leaders

खयालों में जिते रहो, त्यात चार वर्ष निघून जातील, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार बनूनही देशातील सर्वात मजबूत महाविकास आघाडी सरकार आहे, असं म्हटलं आहे. कोण काय बोललं माहिती नाही. तीन दिवसाच्या सरकारचा प्रयोग झाला होता. तीन दिवसांच्या सरकारची पुण्यतिथी आहे. आता तीन महिन्यात जे सरकार बनवणार आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खयालों में जिते रहो, त्यात चार वर्षे निघून जातील, असा टोला संजय राऊतांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना लगावला आहे. (Sanjay Raut criticize BJP leaders)

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढील चार वर्षे पूर्ण करेल, असं स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार मजबुतीनं काम करतेय, तीन पक्षांचे सरकार असूनही अत्यंत भक्कम आणि मजबूत आहे. ते कार्यकाळ पूर्ण करणार आहे,असं राऊतांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अजित पवार यांच्याकडे न देता सुप्रिया सुळे यांच्याकडे देणार असल्याचे म्हटलं होते. संजय राऊतांनी यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. भाजपच्या नेत्यांनी वेगळी गुप्तचर यंत्रणा सुरु केली असेल तर भारत सरकारनं त्यांचा वापर देशपातळीवर करावा. चीनचे घुसखोर कुठुन घुसतात ,याचा शोध घेण्यासाठी त्याचा वापर करावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.(Sanjay Raut criticize BJP leaders)

लव जिहाद बाबत कोण कायदा बनवत असेल तर बनवू द्या. बिहारमध्ये सर्वात चांगला कायदा बनणार आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील बिहार सरकारनं कायदा बनवल्यानंतर आम्ही अभ्यास करु असं संजय राऊत म्हणाले. लव जिहादबाबत सामना वाचावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.(Sanjay Raut criticize BJP leaders)

सामनामधून संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेने आधी लव जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल, अशी भूमिका मांडली. “ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.(Sanjay Raut criticize BJP leaders)

संबंधित बातम्या: 

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

(Sanjay Raut criticize BJP leaders)