पीएमओ कार्यालयाच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना माहिती नसतील, तर तुमची यंत्रणा बदला, राऊतांचा सल्ला

| Updated on: Nov 28, 2020 | 3:01 PM

टीकेसाठी खोटेपणा करु नये," असा सल्लाही राऊतांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांना दिला. (Sanjay Raut Criticizes BJP on PM Modi welcoming during pune Visit ) 

पीएमओ कार्यालयाच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना माहिती नसतील, तर तुमची यंत्रणा बदला, राऊतांचा सल्ला
Follow us on

मुंबई : “महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही टीका करुन आपल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. “विरोधी पक्षाने टीका करावी, टीकेसाठी खोटेपणा करु नये,” असा सल्लाही राऊतांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला. (Sanjay Raut Criticizes BJP on PM Modi welcoming during pune Visit )

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (28 नोव्हेंबर) कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या स्वागतासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही भाजपचे काही नेते यावर टीका करत आहे. यावरुन राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

विरोधी पक्षाने टीका करावी, पण टीकेसाठी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये. मोदींच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे का जाणार नाहीत, याची संपूर्ण माहिती त्यांनी पीएमओ कार्यालयातून घ्यावी. पंतप्रधान मोदींनी केलेल्या ज्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन सरकार करत आहे. मात्र या सूचना भाजप कार्यकर्त्यांना माहिती नसतील, तर तुमची यंत्रणा बदलावी लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पूर्ण पाहिली. फार चांगल्या मूडमध्ये होते. त्यांना आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची संपूर्ण मुलाखत पाहिली, ऐकली आणि वाचली हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये आनंदाचे तरंग उठत आहेत. आपापल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी करत आहेत. विरोधी पक्षानेही टीका करुन आपल्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली, असेही संजय राऊत म्हणाले.

“फडणवीसांची अनेक विधानं आमच्या स्मरणात”

मी असं ऐकलं की, मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा वापरली. मला या विषयावर देवेंद्रजींना उत्तर देता आलं असतं. देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे, सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलोय. सरकारला विरोध करणाऱ्याच्या कुंडल्या माझ्या हातात आहे, असं ते म्हणाले होते. ही काय भाषा आहे. ही भयंकर धमकीची भाषा होती. यंत्रणा वापरुन तुम्हाला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या जवळ ठेवत होते. असे अनेक विधानं आमच्या स्मरणात आहे, असेही राऊतांनी सांगितले

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही पद्धतीने बेकायदेशीरपणे मविआच्या लोकांच्या मागे लागत असेल तर त्यांना त्याचभाषेत उत्तर देणे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. ते शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut Criticizes BJP on PM Modi welcoming during pune Visit)

संबंधित बातम्या : 

फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडे मैदानात

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, थेट उद्धव ठाकरेंवर 10 बोचरे वार