AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, थेट उद्धव ठाकरेंवर 10 बोचरे वार

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने सगळ्या राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन भाजप राज्य शासनाची पोलखोल करणार आहे. याची सुरुवात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भाजप कार्यालयातून केली.

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, थेट उद्धव ठाकरेंवर 10 बोचरे वार
| Updated on: Nov 28, 2020 | 12:27 PM
Share

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन भाजप राज्य शासनाची पोलखोल करणार आहे. याची सुरुवात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भाजप कार्यालयातून केली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बोचरे वार करत येणाऱ्या काळातला भाजपचा इरादा स्पष्ट केला. (LOP Devendra fadanvis Criticized Cm Uddhav Thackeray)

1) उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही.

2) मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली पण त्यात फक्त धमक्या होत्या. सरकारची अ‌ॅचिव्हमेंट काय, व्हिजन काय?

3) हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण तसं दिसत नाही. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीतली भाषा म्हणजे नाक्यावरचं भांडण…

4) उद्धव ठाकरे संविधानिक पदावर, सूडाची भाषा त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्रिपदाला अशी भाषा शोभा देणारी नाही. चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली ते फार काळ टिकले नाहीत.

5) मुख्यमंत्र्यांची मुलाखत न्यायालयाच्या निर्णयाच्या एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता.

6) मुख्यमंत्रिपदाबाबत न दिलेलं वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन लक्षात नाही? शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचं काय? गेल्या काही दिवसांत मी अर्ध्या राज्यात फिरलो पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

7) कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?

8) पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरुन राज्यात सत्तेचा दुरुपयोग, शासकिय यंत्रणेचा मर्जीप्रमाणे वापर होत असल्याचं सिद्ध

9) हिंदुत्वाला धोतर म्हणताय? कसलं तुमचं हिंदुत्व? तुम्ही तर हिंदुत्व कधीच सोडलंय

10) ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही

(LOP Devendra fadanvis Criticized Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.