ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही : देवेंद्र फडणवीस

आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. (we will never demands president rule in maharashtra says devendra fadnavis)

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण आमची तशी मागणी नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 12:03 PM

मुंबई: ठाकरे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं आहे. हे दमनकारी सरकार आहे, असं सांगतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास हे सरकार लायक आहे. पण आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. (we will never demands president rule in maharashtra says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरून राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय राज्यात सत्ता यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचंही कोर्टाने मारलेल्या ताशेऱ्यांवरून स्पष्ट होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे निर्णय पुरेसे असले तरी आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री माफी मागणार का?

कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे. तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून संयम दिसला पाहिजे, असं सांगतानाच तुम्ही पंतप्रधानांकडे आमच्या कितीही तक्रारी केल्या तरी आम्ही रस्त्यावर उतरणारच. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. तुमचा नाकर्तेपणा आहे. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. हा आमचा नाईलाज आहे, असंही ते म्हणाले.

ही कोणती भाषा?

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं, अशी टीका त्यांनी केली. (we will never demands president rule in maharashtra says devendra fadnavis)

हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती, असंही ते म्हणाले. (we will never demands president rule in maharashtra says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

मुख्यमंमत्र्यांची मुलाखत एक दिवस आधी आली हे बरं झालं, नाहीतर तो न्यायालयाचा अवमान ठरला असता : फडणवीस

धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

Devendra Fadnavis | महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

(we will never demands president rule in maharashtra says devendra fadnavis)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.