Sanjay Raut : एक दोन पळून गेले म्हणून काय शिवसेना संपत नाही; हा फक्त धुराळा, राऊतांचा पुन्हा बंडखोरांना टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. एक दोन पळून गेले म्हणून काही फरक पडत नाही. शिवसेना पुन्हा उभी राहील असे राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : एक दोन पळून गेले म्हणून काय शिवसेना संपत नाही; हा फक्त धुराळा, राऊतांचा पुन्हा बंडखोरांना टोला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 1:21 PM

मुंबई : शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. शिवसेना जागेवरच आहे. एक, दोन लोक पळून घेले म्हणजे शिवसेना संपली असे म्हणता येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ दूर होईल शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला काहीही फरक पडला नाही. मालेगाव, नांदगाव इथले कार्यकर्ते मला भेटून गेले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल. मात्र ज्यांनी शिवसेना सोडली ते परत कधीही निवडून येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी नव्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ही सत्ता कायदेशीररित्या स्थापन झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र दुसरीकडे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडेच राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांना शिवसेनेमुळे चांगले दिवस आले. मात्र त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे. भाजपावाले माझ्यबद्दल बोलत नाहीत. मात्र हे 40 बंडखोर बोलत आहेत. ते रोज वेगळ काहीतरी बोलत आहेत. शिवसेना का सोडली तर त्याचे दररोज एक नवे कारण देत आहेत. आतापर्यंत चार कारणे दिली. उद्या पाचवे कारण देतील असे राऊत यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना शिवसैनिकांना संपवायचे आहे. शिवसेनेमुळे शिवसैनिकांना चांगले दिवस आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच नाशिकमध्ये शिवसेना स्थिर आहे. इथे काहीही फरक पडला नसून, महापालिकेत  शिवसेनेची सत्ता येईल असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.