शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

| Updated on: Feb 07, 2021 | 8:06 PM

1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. | Sanjay Raut

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?
या ट्विटमधून संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे एकप्रकारे काँग्रेस नेते कशाप्रकारे तोंडघशी पडले, हे प्रतित होत आहे.
Follow us on

मुंबई: भाजप हा पक्ष शिवसेनेच्या मार्गाने चालत नाही. तसे करायचेच असते तर आज महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, या केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक झळाळून उठली आहे, अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut reffering congress leaders misatkes while criticizing Amit shah)

1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटमधून संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, संजय राऊत यांच्या ट्विटमुळे एकप्रकारे काँग्रेस नेते कशाप्रकारे तोंडघशी पडले, हे प्रतित होत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत डावलले जात असल्यामुळे अगोदरच असंतुष्ट असलेल्या काँग्रेसच्या नाराजीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?

अमित शाह यांनी कणकवली येथील कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले नव्हते, असा खुलासा केला. तुम्ही म्हणता की मी बंद खोलीत वचन दिले. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झालेले नाही, सांगतानाच यांनी पंतप्रधान मोदी यांची मोठी पोस्टर्स लावून तत्वासाठी मते मागितली. त्यावेळी आम्ही मंचावरून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, ते मुख्यमंत्री बनतील असे सतत सांगत होतो. त्यावेळी तुम्ही काही का बोलला नाहीत, असा अमित शाह यांनी उपस्थित केला होता.

शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती असेही शाह यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?; अरविंद सावंतांनी उडवली खिल्ली

(Sanjay Raut reffering congress leaders misatkes while criticizing Amit shah)