AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा! काय आहे नेमकी क्रोनोलॉजी?

पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी केली जात आहे. त्याच मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिली आहे.

Sanjay Raut : प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा! काय आहे नेमकी क्रोनोलॉजी?
प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा!Image Credit source: tv9
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 10, 2022 | 8:57 AM
Share

मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात रोज आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोनाच्या (Corona) काळात घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा नील सोमय्या या दोघांनी मिळून आयएनएस विक्रांतच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ‘इंतजार करो कलतक!’असा आशय लिहिला आहे. तसेच कालचं ट्विट त्यांनी देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग सुध्दा केलं आहे. आज त्यांनी सकाळी दुसरं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांची देणगी दिली आहे असं ट्विट केलं आहे.

मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी

पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी केली जात आहे. त्याच मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिली आहे. क्रोनोलॉजी समजून घ्या, हिसाब तो देना पडेगा भाई ! असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोमवारी सुध्दा त्यांनी एक ट्विट केलं होतं. तसेच आज सकाळी त्याबाबत दुसरं ट्विट केलं आहे. त्यामुळे आज दिवसभर काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा.डॉ.मेधा किरीट सोमय्या यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत कोणत्याही आधाराशिवाय अनुचित विधान करत असल्याचा आरोप मेधा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?