अजित पवार शिवसेनेचे स्टार प्रचारक : संजय राऊत

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Oct 19, 2019 | 12:19 PM

संभाजी पवार येवला-लासलगावातून निवडून यावे अशी अजित पवारांची इच्छा आहे (Sanjay Raut on Ajit Pawar). अजित पवार हे राष्ट्रवादीचे नाही, तर शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

अजित पवार शिवसेनेचे स्टार प्रचारक : संजय राऊत

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेनेचा प्रचार करत आहेत (NCP Ajit Pawar). राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रचारासाठी लासलगावात येऊन गेले, पण अजित पवार येथे येणार नाहीत. कारण, संभाजी पवार येवला-लासलगावातून निवडून यावे अशी अजित पवारांची इच्छा आहे (Sanjay Raut on Ajit Pawar). अजित पवारांनी बाळासाहेबांच्या अटकेबाबत भांडाफोड केला, छगन भुजबळांची पोलखोल केली, त्यामुळे अजित पवार हे राष्ट्रवादीचे नाही, तर शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्याचा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांची लासलगाव सभा आयोजित करण्यात आली होती (Sanjay Raut on Ajit Pawar).

येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 15 वर्षांत काहीही विकास कामं केली नाहीत. त्यांनी तुरुंगात विकास केला. ज्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं होतं तिथे त्यांनी लाईट लावून घेतले. भितींवर रंग काम करवून घेतले. कारण, त्यांना तिथे बरेच दिवस राहायचं होतं, असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

370 कलमाचा विषय काढला की, शरद पवारांच्या पोटात दुखत : संजय राऊत

370 कलमाचा विषय काढला की, शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या पोटात गोळा उठतो. काश्मीर हा देशाचा भाग आहे. काश्मीरसाठी आमच्या महाराष्ट्रातील अनेक जवान शहीद झाले आहेत. आमच्या सरकारने 370 कलम हटवलं, यानिमित्ताने आम्ही शहीद जवानांचे स्मरण करतो, तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय, असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली.

भुजबळांना कुणी घेतलं नाही म्हणून आज ते राष्ट्रवादीत : संजय राऊत

निष्ठेला महत्व असून शिवसेना निष्ठा बदलत नाही. ज्यांनी निष्ठा बदलली ते जेलमध्ये गेले, असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांवर निशाणा साधला. निवडणुकीआधी छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र, भुजबळ यांना कोणीही पक्षात घेतलं नाही, म्हणून आज ते राष्ट्रवादीत आहेत. त्यांना सर्व पक्षाचे दरवाजे बंद असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आघाडीचे नेते त्यांच्या मतदारसंघात अडकून : संजय राऊत

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपल्या मतदारसंघात अडकून पडले आहेत, म्हातारा माणूस संपूर्ण राज्यात फिरतोय. चांगली गोष्ट आहे, वयोवृद्ध माणसाने हातपाय हालवत फिरायलं हवं प्रकृती नीट राहाते, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेस-राष्ठ्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI