‘मोदींशी वाकडं नव्हतंच, जुळवून घेण्याचा प्रश्न येतो कुठे…?’, सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांचा रोखठोक अग्रलेख

| Updated on: Jun 22, 2021 | 7:08 AM

सरनाईक यांच्या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत, असा टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. (Sanjay Raut Saamana Editorial Over Shivsena MLA Pratap Sarnaik Wrote Cm Uddhav Thackeray letter)

मोदींशी वाकडं नव्हतंच, जुळवून घेण्याचा प्रश्न येतो कुठे...?, सरनाईकांच्या पत्रानंतर राऊतांचा रोखठोक अग्रलेख
उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक
Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून पंतप्रधान मोदींशी (PM Narendra Modi) जुळवून घेण्याची विनंती केली. या पत्रातून सेनेने भाजपशी पुन्हा युती करावी, असंही त्यांनी एकप्रकारे सांगितलं. यानंतर राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राऊत (Sanjay Raut) यांनी ‘ताजा कलम’ लिहून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन सरनाईकांसाठी काही सवाल उपस्थित केले आहेत, ज्याचा विचार सरनाईकांना येत्या काळात करावा लागणार आहे. (Sanjay Raut Saamana Editorial Over Shivsena MLA Pratap Sarnaik Wrote Cm Uddhav Thackeray letter)

‘मोदींशी वाकडं नव्हतंच, जुळवून घेण्याचा प्रश्न येतो कुठे…?’

पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘ वाकडे-तिकडे ‘ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?, असा सवाल करत तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, असं आजच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत.

सरनाईकांच्या पत्राने ‘राजकारणाची नवी चाहूल’ असं ज्यांना वाटतं ते राजकारणातील कच्चे लिंबू

केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत, असा टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

सरनाईकांनी पत्र का लिहिलं, राऊतांनी ‘कारण’ सांगितलं!

सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

विनाकारण त्रास म्हणजे काय, तर तो हाच…!

ऐन निवडणूक मोसमात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला गेला होता. एवढेच नव्हे तर, विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री व इतर दोघांना ‘नारद’ घोटाळ्यात बेकायदेशीर अटक केली गेली. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय कार्यालयात घुसून सगळय़ांचीच दाणादाण उडवली. त्या घोटाळ्याचे इतर दोन प्रमुख नेते (त्यातले एक सुखेन्दू अधिकारी) भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सीबीआयने टाळले. ‘विनाकारण त्रास’ जो काही आहे तो हाच, असंही राऊत अग्रलेखात म्हटलं आहे.

जे धोरण बंगालात राबवलं तेच महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न

जे गुन्हेगार आमच्याबरोबर आहेत ते सोडले जातील. जे भाजपबरोबर नाहीत त्यांना विनाकारण त्रास देऊन अडकवले जाईल हे धोरण पश्चिम बंगालात राबवले तेच महाराष्ट्रात राबविण्याची तयारी आधीच सुरू झाली आहे, असं राऊत म्हणाले.

(Sanjay Raut Saamana Editorial Over Shivsena MLA Pratap Sarnaik Wrote Cm Uddhav Thackeray letter)

हे ही वाचा :

“अन्यायाविरुद्ध मर्दासारखं लढायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; वाचा संपूर्ण पत्रं जसच्या तसं