हिंदी सक्तीच्या आदेशाची ठाकरे गटाकडून होळी, राऊतांनी सविस्तर सांगितलं, म्हणाले…

संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. हिंदीसक्तीविरोधात त्यांनी महाराष्ट्राला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

हिंदी सक्तीच्या आदेशाची ठाकरे गटाकडून होळी, राऊतांनी सविस्तर सांगितलं, म्हणाले...
sanjay raut
| Updated on: Jun 28, 2025 | 3:28 PM

Sanjay Raut : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवला जाण्याच्या आणि त्रिभाषा सूत्राचा राज्यात कडाडून विरोध केला जात आहे. सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. ठाकरे गटाने तर हाहीही झालं तरी हिंदी भाषासक्ती होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतलाय. ठाकरे गट येत्या 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करणार आहे. तसेच येत्या 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून मोठी माहिती दिली आहे.

एकजुटीची ताकद दाखवुया- राऊत

खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हिंदीसक्तीच्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. तसेच येत्या 29 जून आणि 5 जुलै रोजी नेमका कशा पद्धतीने सरकारच्या या धोरणाला विरोध केला जाईल, याची माहिती दिली आहे.मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवुया असं म्हणत राऊत यांनी हिंदीसक्तीचा मोर्चा आणि शासन निर्णयाच्या होळी करण्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

राऊतांच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे?

हिंदी सक्तीचा सरकारी निर्णय,फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. 29 जून रोजी रविवारी 3 वाजता ही होळी आझाद मैदानावर आयोजित करण्यात येईल. तसेच येत्या ५ जुलै रोजी मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुखांची एक बैठक होईल. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.29 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक होणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.

मनसे, ठाकरे गटाचा एकत्र मोर्चा निघणार- राऊत

तसेच राऊतांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी हिंदीसक्तीच्या सरकारी निर्णयाची होळी करूया. मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवुया, असंही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, दरम्यान, 5 जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.