दिल्लीत राजकारणाला मोठं वळण देणाऱ्या दोन घडामोडी! संजय राऊत काँग्रेस नेत्यांची भेट घेणार, तर शरद पवारांनीही बोलावली महत्वपूर्ण बैठक

| Updated on: Dec 06, 2021 | 7:12 PM

उद्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या महत्वाच्या दोन बैठकांकडे देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीत राजकारणाला मोठं वळण देणाऱ्या दोन घडामोडी! संजय राऊत काँग्रेस नेत्यांची भेट घेणार, तर शरद पवारांनीही बोलावली महत्वपूर्ण बैठक
शरद पवार, संजय राऊत
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना असं राजकारण जोरात सुरु आहे. अशावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (National Democratic Front) बाहेर पेडलेली शिवसेना आता संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये (United Progressive Front) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या महत्वाच्या दोन बैठकांकडे देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना यूपीएत सहभागी होणार?

एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत संजय राऊत, आदित्य ठाकरे, शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आता यूपीए शिल्लक नसल्याचं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून काँग्रेसला वगळून भाजपला विरोध शक्य नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झालीय. त्याचाच भाग म्हणून उद्या संजय राऊत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याची चर्चा आता सुरु झालीय.

शिवसेना 2019 पासून एनडीए आणि यूपीएबाहेर

महाविकास आघाडी स्थापन करुन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना शिवसेना एनडीए बाहेर पडली होती. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवेसना राष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी झाली नव्हती.

शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीत महत्वाची बैठक

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या दुपारी साडे तीन वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून या बैठकीत पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूका कार्यक्रम आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विशेष निमंत्रित आणि कार्यकारिणी सदस्य जे मंत्री आहेत त्यांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान या बैठकीत युपीए किंवा ममता बॅनर्जी हा मुद्दा नसून फक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या :

OBC Reservation : ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! भाजप नेते आक्रमक, ठाकरे सरकारवर हल्लाबोल

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार अभ्यास करेल, नवाब मलिकांची माहिती; ओबीसी नेते आक्रमक