शिरसाटांचं उठून जाणं बरं नाही, नुसती तडफड, मनात खदखद… औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंची टीका

संजय शिरसाट यांचं हे वागणं योग्य नाही, असं वक्तव्य खैरे यांनी केलं. ते म्हणाले,' मी सिनियर आहे. मला बोलावलं वर बसवलं. माझं नाव घेतल्यानंतर याला काय झालं?

शिरसाटांचं उठून जाणं बरं नाही, नुसती तडफड, मनात खदखद... औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंची टीका
संजय शिरसाट यांना चंद्रकांत खैरे यांचा सल्ला Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:06 PM

औरंगाबादः आपल्याआधी चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांचा सत्कार होताना पाहून उठून जाणारे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि त्यांची समजूत घालणारे खा. इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हे दृश्य सध्या राजकारणात प्रचंड चर्चेचा विषय़ ठरतंय. अनुभवी नेता म्हणून माझा आधी सत्कार झाला तर संजय शिरसाट यांनी नाराज होण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी आधी माझ्याच अंडर काम केलंय. आता आमदार झाले, सत्तेत आले, साहेब झाले म्हणून एवढी मगरूरी काहीच कामाची नाही. जनता पाहतेय, लोक काय म्हणतील, एवढा मगरूर झाला का? शिरसाट सध्या नाराज असले तरी त्यांनी सबुरीनं घ्यावं, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. औरंगाबादमधील एका कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार, खासदार आणि चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. यावेळी आधी खैरे यांचा सत्कार करण्यात आला, त्यामुळे नाराज झालेले शिरसाट उठण्याच्या तयारीत होते. पण खा. जलील यांनी त्यांची समजूत काढली आणि खाली बसवलं.

चंद्रकांत खैरे यांचा सल्ला काय?

संजय शिरसाट यांचं हे वागणं योग्य नाही, असं वक्तव्य खैरे यांनी केलं. ते म्हणाले,’ मी सिनियर आहे. मला बोलावलं वर बसवलं. माझं नाव घेतल्यानंतर याला काय झालं? याने माझ्या अंडर काम केलेलंय. त्यांच्या मनात खदखद आहे. इतक्या उड्या मारल्या. मग आत झालं काय तर ? मंत्रिपद न दिल्यामुळे तडफड चालू आहे. ‘साहेब’ आता आमदार असतील. पण ते आमदार होण्यासाठी याच खुर्चीवर बसून मी अडीच हजार फोन केले होते नागरिकांना. शिरसाट निवडून आले. पश्चिमचा आमदार वाढल्याचा मला आनंद झाला. पण आता असं बरोबर नाही. हे जनतेला आवडलं नाही. जनता काय म्हणेल, लगेच मगरूर झाला का….? खा. जलील शत्रू जरी असला तरी त्यांनी समजून सांगितलं. शिरसाट यांचं वागणं म्हणजे बाष्कळपणा आहे. अशा पद्धतीनं वगणं चुकीचं आहे, यामुळेच त्याची प्रगती होत नाही, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.

भर कार्यक्रमातून शिरसाट उठून जात होते…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस प्रशासनाने रविवारी समन्वय समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यानिमित्तानं सर्वच पक्षांच्या नेत्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आलं. व्यासपीठावर आमदार संजय शिरसाट, खा. इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांच्यासह चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सुरुवातीला सत्कार समारंभ झाला. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याने पहिल्यादा आधी थेट चंद्रकांत खैरे यांचाच सत्कार केला. पण हे प्रोटोकॉलनुसार नाही, असे म्हणत शिरसाट नाराज झाले. व्यासपीठावरून उठून निघून जाऊ लागले. एवढ्यात बाजूलाच बसलेल्या खा. जलील यांनी त्यांना थांबवलं. समजूत काढली आणि जागेवर बसवलं. शिंदेगट आणि शिवसेनेतील मतभेद आता जगजाहीर झालेत. मात्र भर कार्यक्रमात जनतेसमोर झालेला हा प्रसंग सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.