Sanjay Shirsat: “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार, ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम” संजय शिरसाट यांचा डायरेक्ट यू-टर्न!

| Updated on: Aug 13, 2022 | 10:26 AM

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता संजय शिरसाट यांनीच देत भाष्य केलंय.

Sanjay Shirsat: मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार, ते ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम संजय शिरसाट यांचा डायरेक्ट यू-टर्न!
Follow us on

औरंगाबाद : संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काल एक ट्विट केलं त्याची जोरदार चर्चा झाली. शिरसाट पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा झाली. त्यावर आता संजय शिरसाट यांनीच आपली प्रतिक्रिया देत पडदा टाकलाय. “मी एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. का झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी यू-टर्न घेतलाय. शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.

हे सुद्धा वाचा

मी जे ट्विट केलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठीमागे एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली होती. आजही माझं असं मत आहे जर तुम्ही कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत असाल त्यावेळी मग तुम्ही कुटुंबाचं असलेलं मत कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या मतावर नाही तर कुटुंबाच्या मताबद्दल विचार केला पाहिजे होता. कुटुंबाच्या मताला तुम्ही मान दिला पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ होता. मी ट्विट केलं याचा अर्थ कुटुंबप्रमुख ते राहिले असते, आम्ही नेहमीच त्यांना कुटुंब प्रमुख मानत आलो, परंतु त्यांनी आमचं त्या वेळेला ऐकलं नाही आणि आजची जी अवस्था झाली त्याबद्दल आम्हालाही खेद वाटतोय, असंही शिरसाट म्हणालेत.