Satara District Central Cooperative Bank Election: साताऱ्यात शिंदे गटाची गेमचेंजर खेळी! निवडणुकीचा गुलाल उधळल्यानंतर शंभूराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया

Satara District Central Cooperative Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी पहिली गुड न्यूज आली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीचा सामना होता.

Satara District Central Cooperative Bank Election: साताऱ्यात शिंदे गटाची गेमचेंजर खेळी! निवडणुकीचा गुलाल उधळल्यानंतर शंभूराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया
Shambhuraj Desai
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 11:03 AM

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. येथील पाटण सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई हे विजयी झाले आहेत. जवळपास 45 वर्षांनंतर देसाई गटाचा संचालक होणार असल्यामुळे मोठा जल्लोष केला जात आहे. या विजयानंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे.

शंभुराज देसाई यांना 58 मते मिळाली आणि विजय झाले. या विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, शिवसेनेवर विश्वास ठेवला त्या सर्व सन्माननिय मतदार बंधू-भगीनींचे सर्वप्रथम आभार मानतो. माझ्यावरती, देसाई कुटुंबावरती विश्वास ठेवून आज जवळपास 45 वर्षांनंतर देसाई गटाचा संचालक स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांच्या नंतर 45 वर्षांनी आम्ही जिल्हा बँकेमध्ये गेलो आहोत. आणि केवळ एकटा नाही तर आमच्या मंगलापाटील देखील बिनविरोध निवडणून आल्या आहेत. म्हणजे दोन संचालक पहिल्यांदा देसाई गटाचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत” असे शंभूराज देसाई म्हणाले.

Loading...

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी पहिली गुड न्यूज आली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीचा सामना होता. पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जावळी सोसायटी मतदारसंघ

१) विठ्ठल गोळे ८ मते राष्ट्रवादी

२) ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते विजयी भाजप

खंडाळा सोसायटी मतदारसंघ

१) अजय भोसले राष्ट्रवादी २८ मते

२) संजीव गाढवे भाजप २१ मते

३) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते

महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ

१) रुपाली राजपुरे राष्ट्रवादी ८ मते विजयी

२) संजय मोरे शिवसेना ४ मते

पाटण सोसायटी मतदारसंघ

१)शंभूराज देसाई शिवसेना ५८ मते विजयी

२) सत्यजीत पाटणकर भाजप ४६ मते

मान सोसायटी मतदारसंघ

१) जयकुमार गोरे भाजप ५३ मते

२) मनोज पोळ राष्ट्रवादी १४ मते

३) शेखर गोरे शिवसेना ७ मते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us