चंद्रकांत पाटलांना पदवीधरांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही, सतेज पाटलांची घणाघाती टीका

चंद्रकांत पाटील यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली,असा आरोप सतेज पाटील यांनी केला. Satej Patil criticize Chandrakant Patil

  • साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी
  • Published On - 16:12 PM, 29 Nov 2020
satej patil cahndrakant patil

कोल्हापूर: राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदरासंघातील महाविकास आघाडी उमेदवारांचा प्रचारासाठी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील हे गेली 12 वर्षे पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. गेली पाच वर्षे सत्तेत होते. त्यांनी पदवीधरांचे प्रश्‍न का सोडविले नाहीत, असा सवाल विचारला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली, त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्‍नावर बोलण्याचा अधिकारच नाही, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. (Satej Patil criticize Chandrakant Patil)

इचलकरंजी शहरातील तोष्णीवाल गार्डनमध्ये पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रा.जयंत आसनगावकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

सतेज पाटील यांनी पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केले. शिक्षक मतदार संघातून कोल्हापूर जिल्ह्याला आमदार होण्याचा पहिल्यांचा मान मिळणार असल्यांने प्रा. जयंत आसनगावकर यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. (Satej Patil criticize Chandrakant Patil)

खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन चांगले काम केले आहे. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकार्‍यांचे अधिकार कमी करण्याची गरज आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा असल्यांने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हा असणार आहे.

पुणे शिक्षकचे उमेदवार प्रा.आसगांवकर यांचेही भाषण झाले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विरोधकांच्या बुध्दीभेद आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार राजू आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी.डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले. (Satej Patil criticize Chandrakant Patil)

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

पुणे पदवीधर 

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्रामसिंह देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)

पुणे शिक्षक 

जयंत आसनगावकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)


संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार, दमछाक होऊन नवव्या फेरीत जिंकले : सतेज पाटील

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची एक जागा काँग्रेसला द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची : सतेज पाटील

(Satej Patil criticize Chandrakant Patil)