चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार, दमछाक होऊन नवव्या फेरीत जिंकले : सतेज पाटील

पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन प्रदेशाध्यक्षांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार, दमछाक होऊन नवव्या फेरीत जिंकले : सतेज पाटील
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 4:29 PM

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या (Pune Graduate Constituency Election) मागच्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण, आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली. (satej patil criticized on Chandrakant Patil in Pune Graduate Constituency Election)

यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी भाजपवरही टीका केली आहे.भाजपच्या विचारांना थांबवणं ही काळाची गरज आहे. त्यामुळेच राज्याच्या सत्तेमध्ये महाविकास आघाडीतील घटक एकत्र आलेले असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. तर यावेळी महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये पूर्वी इतकी चुरस नव्हती. मात्र, आता तीनही पक्ष राज्यांमध्ये पाच जागा लढवत असून याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय पक्का असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुण्यातील पदवीधर निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत पुणे पदवीधर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन प्रदेशाध्यक्षांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी टाळण्यात यश आलं. पण मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरेंमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. (satej patil criticized on Chandrakant Patil in Pune Graduate Constituency Election)

पुणे पदवीधर मतदारसंघात दोन्ही तुल्यबळ उमेदवार हे सांगलीतले आहेत. त्यामुळे त्या भागात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात यावेळी मनसे फॅक्टर आघाडीला डोकेदुखी ठरणारा आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील पदवीधर कोणाच्या बाजून कौल देतात, आणि प्रभावी मतदार नोंदणी केल्याचा फायदा कोणाला होणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. (Pune Graduate Constituency Election Candidates Special Report)

गेल्या वेळी पुणे पदवीधर निवडणूक निकाल चंद्रकांत पाटील (भाजप) (विजयी) – 61,453 सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59,072 अरुण लाड (बंडखोर)- 37,189 शैला गोडसे – 10,594 शरद पाटील – 8,519

संबंधित बातम्या – 

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा

Special Report | पुणे पदवीधर निवडणुकीत कोणत्या पाटलांची कॉलर टाईट?

(satej patil criticized on Chandrakant Patil in Pune Graduate Constituency Election)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.