काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सत्यजित तांबेंसह चार नावं चर्चेत

| Updated on: Dec 08, 2020 | 9:48 AM

मुंबई: विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य नावांची यादी समोर आलीय. यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील उमेदवारांच्या नावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते. (opportunity for Satyajit Tambe […]

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सत्यजित तांबेंसह चार नावं चर्चेत
Follow us on

मुंबई: विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य नावांची यादी समोर आलीय. यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील उमेदवारांच्या नावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते. (opportunity for Satyajit Tambe from Congress for MLC election)

सत्यजित तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे. गेल्या दीड दशकांपासून तांबे यांनी युवक काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम केलं आहे. तसंच जयहिंद युवा मंचाद्वारे तांबे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

सत्यजित तांबे यांचे वडीलही विधान परिषदेवर!

सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळं सत्यजित तांबे यांना काँग्रेसनं संधी दिल्यास बाप-लेक एकाच वेळी विधान परिषदेच्या बाकावर बसलेले पाहायला मिळू शकतात!

काँग्रेसमध्ये अजून तीन नावांची चर्चा!

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा आहेत. त्यापैकी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव चर्चेत आहे. त्याबरोबरच नसीम खान, रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा आहे.

काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील चार नावं समोर आली आहे. त्यात भाजपमधील नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव चर्चेत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावालाही पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांची नावही चर्चेत आहेत.

राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्षाची शक्यता!

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर जूनमध्येची निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला तर सरकार कोर्टात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या: 

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित; राजू शेट्टींना दिलेलं वचनही पाळणार

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर पाठवणार?

opportunity for Satyajit Tambe from Congress for MLC election