ना गड, ना घाट, धनंजय मुंडेंनी धरली माहूरगडाची वाट

धनंजय मुंडे (Dasara Melava Dhananjay Munde) यांच्या नशिबी मात्र गडही नाही आणि घाटही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना (Dasara Melava Dhananjay Munde) माहूरगडाची वाट धरावी लागली.

ना गड, ना घाट, धनंजय मुंडेंनी धरली माहूरगडाची वाट

बीड : दसरा मेळाव्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व भाविक दर्शनासाठी भगवान गडावर दाखल झाले. तर दुसरीकडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट इथे शक्तीप्रदर्शन केलं. मात्र धनंजय मुंडे (Dasara Melava Dhananjay Munde) यांच्या नशिबी मात्र गडही नाही आणि घाटही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना (Dasara Melava Dhananjay Munde) माहूरगडाची वाट धरावी लागली.

दसऱ्याच्या स्वतःच्या जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना धनंजय मुंडे यांना मुकावं लागलं. त्यामुळे परजिल्ह्यातील माहूर गडावर धनंजय मुंडे यांनी आपला दसरा साजरा केला. पण भगवान गड आणि दसरा मेळावा या दोन्ही विषयावर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं आहे.

मुंडे भगिनींचं शक्तीप्रदर्शन

पंकजा मुंडे यांचं शक्तीप्रदर्शन अनेक अर्थांनी महत्त्वाचं होतं. कारण, दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यापेक्षा या मेळाव्याला महत्त्व होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे परळीत आमनेसामने आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सावरगावात येऊन पंकजा मुंडे यांच्या कामाचं कौतुक केलं. लाखोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायालाही अमित शाहांनी संबोधित केलं.

या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून भाविक आले होते. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन रॅली काढली. सावरगावाच्या मार्गातील अनेक गावातील वाहने त्यांच्या ताफ्यात जोडली गेली आणि हा शेकडो वाहनांचा ताफा सावरगावात दाखल झाला. तर पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने अमित शाह यांना औरंगाबादहून घेऊन आल्या.

VIDEO : पंकजा मुंडे आणि अमित शाह यांचं दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *