आम्ही कुणालाही झटके देत नाही; अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक: शंभुराज देसाई

| Updated on: Dec 22, 2020 | 6:35 PM

भाजपमधून शिवसेनेत इनकमिंग सुरू झाली असून त्यावर राज्याचे गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (shambhuraj desai reaction on BJP workers enter in shivsena)

आम्ही कुणालाही झटके देत नाही; अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक: शंभुराज देसाई
Follow us on

सांगली: भाजपमधून शिवसेनेत इनकमिंग सुरू झाली असून त्यावर राज्याचे गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कुणालाही झटका देत नाही. अनेक नेत्यांना शिवसेनेत यायचं आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, असा शंभुराज देसाई यांनी विरोधकांना लगावला. (shambhuraj desai reaction on BJP workers enter in shivsena)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभुराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कुणालाही झटके देण्यासाठी काम करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ होत आहे. शांत आणि संयमी स्वभावाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभर राज्याचा कारभार हाताळला आहे. त्यामुळेच अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत, असं सांगत देसाई यांनी आगामी काळात शिवसेनेत इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरेकरांवर टीका

यावेळी त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही फटकारले. राज्य सरकारने राज्यात नाईट संचारबंदी लागू केली आहे. त्यावरून दरेकर यांनी सरकारवर टीका केली होती. दरेकरांनी चार दिवसांच्या वर्तमानपत्रातील बातम्या बघायला हव्या होत्या. यूरोपीयन देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. इतर राष्ट्रांमध्ये नव्या कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. या नव्या कोरोनाचा फैलावण्याचा वेग अधिक असून हा कोरोना जीवघेणा आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे कोणताही कहर नाही. जनतेच्या संरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आहे, असं देसाई म्हणाले.

विरोधी पक्षाला भान हवं

मॉल किंवा रेस्टॉरंटचा रात्री 10 च्या आत काय लाभ घ्यायचा तो घ्या. रात्री 11 ते पहाटे 7 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. राज्यातील जनतेच्या हितासाठीचा हा निर्णय आहे, याचं भान विरोधी पक्षालाही असायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला. (shambhuraj desai reaction on BJP workers enter in shivsena)

 

संबंधित बातम्या:

उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला त्यांच्यामुळे फायदा तरी कुठे झाला?: राऊत

भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांची टोलेबाजी

(shambhuraj desai reaction on BJP workers enter in shivsena)