Sharad Pawar : केंद्रीय तपास यंत्रणा ‘मातोश्री’पर्यंत पोहोचल्या म्हणून तुम्ही मोदींना भेटलात? पवार म्हणतात, नाही नाही…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केलीय. राऊतांवर अन्याय झालाय, त्याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Sharad Pawar : केंद्रीय तपास यंत्रणा मातोश्रीपर्यंत पोहोचल्या म्हणून तुम्ही मोदींना भेटलात? पवार म्हणतात, नाही नाही...
शरद पवार, नरेंद्र मोदी भेट (फाईल फोटो)
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 5:12 PM

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेते, मंत्री, आमदार, खासदारांवरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या  धाडी सुरुच आहेत. आता तर आयकर विभाग थेट ‘मातोश्री’पर्यंत पोहोचलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलीय. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केलीय. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केलीय. राऊतांवर अन्याय झालाय, त्याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शरद पवार, नरेंद्र मोदींची दिल्लीत बैठक

राऊतांवर कारवाई करण्याची गरज काय होती?

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई झाली. ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत. याबाबत मी मोदींना कल्पना दिली आहे. या 2 विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मोदींना दिला आहे. राऊतांवर कारवाई करण्याची गरजच काय होती? असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय.

राऊतांवरील कारवाईवरुन पवारांची मोदींकडे तक्रार

लक्षद्वीपच्या मुद्द्याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले

शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींना मी एकटा भेटलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. हे देखील बैठकीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात सुरु असलेल्या रोषाची माहिती दिली. मी फक्त सोबत उपस्थित होतो. तसंच मी ही दोन मुद्यांकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं, असं पवारांनी सांगितलं.

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोललो आहे. अजूनही त्या आमदारांची नियुक्ती झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिल्याचंही शरद पवार म्हणाले.

इतर बातम्या : 

Sharad Pawar Narendra Modi Meet : संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय?; राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार

BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन