पिंपरीत पेन्सिलीनचा कारखाना कसा सुरु झाला? पवारांनी थेट गांधीबाबाची गोष्ट सांगितली

| Updated on: Oct 17, 2021 | 8:17 PM

शरद पवार यांनी महागाई, इंधन दरवाढ, उद्योग, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, केंद्र सरकारचं कामगार धोरण अशा अनेक मुद्द्यांवर भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी पवारांनी पिंपरीमध्ये पेन्सिलीनचा कारखाना कसा सुरु झाला, याबाबतची एक गोष्ट सांगितली.

पिंपरीत पेन्सिलीनचा कारखाना कसा सुरु झाला? पवारांनी थेट गांधीबाबाची गोष्ट सांगितली
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पिंपरी चिंचवडमधून एकप्रकारे रणशिंगच फुंकलं आहे. यावेळी शरद पवार यांनी महागाई, इंधन दरवाढ, उद्योग, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, केंद्र सरकारचं कामगार धोरण अशा अनेक मुद्द्यांवर भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी पवारांनी पिंपरीमध्ये पेन्सिलीनचा कारखाना कसा सुरु झाला, याबाबतची एक गोष्ट सांगितली. (How did a penicillin factory come up in Pimpri Chinchwad? Sharad Pawar told the story)

पिंपरी-चिंचवड मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स औषध निर्मिती करण्याऱ्या कंपनीला खूप मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी हे अहमदनगर मध्ये होते. तेंव्हा कस्तुरबा गांधी आजारी पडल्या, पण त्या आजाराचे औषध भारतात नव्हते. त्या आजारपणातच कस्तुरबा गांधी मरण पावल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हे औषध उपलब्ध झाले पाहिजे असं म्हटलं. त्या नंतर पिंपरीमध्ये पेन्सिलिनचा हा कारखाना सुरू झाला, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकार कामगारविरोधी असल्याचा पवारांचा आरोप

पिंपरी-चिंचवड मधील टाटा कंपनी जेव्हा राज्य सोडून निघाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे टाटा यांना भेटले. चव्हाण यांनी टाटांना सर्व सोयी देण्याचं आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. पण तुम्ही पिंपरीत या असं सांगितलं आणि टाटा इथं आले, असंही पवारांनी सांगितलं. मात्र, दिल्लीचे सरकार नवीन कारखाने सुरु व्हावीत यासाठी अनुकूल नाही. ते कामगार विरोधी आहेत. जे कामगार विरोधी निर्णय घेतात. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही पवारांनी केलीय.

‘ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही’

केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलंय. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.

इतर बातम्या : 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था कराच’, परीक्षेच्या गोंधळावरुन भातखळकरांचा आरोग्यमंत्र्यांना टोला

How did a penicillin factory come up in Pimpri Chinchwad? Sharad Pawar told the story